वर्धा जिल्हात चार तलवारींसह दोघांना पोलिसानी ठोकल्या बेड्या.
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा:- वर्धा जिल्हातुन एक बातमी समोर आली आहे. तलवारी बाळगणार्या दोघांना तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. जुगनसिंग बादलसिंग बावरी वय 40 वर्ष आणि निर्मलसिंग अमीचंदसिंग जुनी वय 30 वर्ष दोघेही रा. तळेगाव शा. प. अशी आरोपींची नावे आहे. ही कारवाई सोमवार 4 रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
तळेगाव हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 6 वर वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गुप्त माहितीच्या आधारे तळेगाव येथील आष्टी टी-पॉइंटवर शस्त्र विक्रीसाठी बसून असलेले आढळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता 4 धारदार शस्त्र (तलवारी) आढळून आल्या. 1500 रुपये किंमतीच्या तलवारी जप्त करून दोन्ही आरोपींना तळेगाव पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आले.