गोंडपीपरी तालुक्यातील गुजरी गावात पाणी टंचाई; आंदोलन करण्याचा रेखा रामटेके यांच्या इशारा.

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- सात दिवसापासून गुजरी गावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.गावातील नळांना कोरड पडली आहे.पाणी पुरवठा सूरू करा, यासाठी गावकर्यांनी प्रशासनाला निवेदन दिलीत. मात्र गुजरीवासीयांची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्पतरता दाखविली नाही. दरम्यान पाणी पुरवठा त्वरीत सूरू न केल्यास आंदोलन करू असा इशारा महीला काँग्रेसचा अध्यक्षा रेखा रामटेके यांनी दिला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील चेकबापुर प्रादेशीक पाणीपुरवठा योजनेतुन सात गावांना पाणी पुरवठा केला जातो. या गावात गुजरी गावाचा समावेश आहे. मात्र मागील सात दिवसापासून गुजरी गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नसल्याने पाण्यासाठी दाहीदिशा गावकर्यांना भटकावे लागत आहे. नाल्यातील गढूळ पाण्याने गावकरी तहान भागवित आहेत. त्यामुळे अख्या गावाचेच आरोग्य धोक्यात आले आहे. गावकर्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. समस्या सोडविण्याची विनंती केली. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.गावकर्यांनी तालुका महीला काँग्रेसचा अध्यक्षा रेखा रामटेके यांची भेट घेऊन समस्या वाचली. रामटेके यांनी गावकर्यांना घेत सवर्ग विकास अधिकारी तथा तहसिलदारांना निवेदन दिले. तिनदा निवेदन देऊनही समस्या जैसे थेच आहे. दरम्यान पाणी पुरवठा त्वरीत सूरू न केल्यास आंदोलन उभारु असा इशारा रामटेके यांनी दिला आहे.