कळमेश्वर शहरात 2 चुलत जावांचा विधुत करंट लागल्याने दुर्दैवी मृत्यू.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
कळमेश्वर,दि.5:- नागपुर जिल्हातील कळमेश्वर मधून एक मन हेलावणारी दुर्दैवी बातमी समोर आली आहे. कळमेश्वर येथील स्थानीय वॉर्ड क्र. मध्ये मंगलवार रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी जिवंत खुल्या तारेच्या विधुत प्रवाहाने दोन चुलत जावांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अलका निरंजन विरुळकर वय 42 वर्ष, व मंजू पुरुषोत्तम विरुळकर वय 48 वर्षे अशी मृतक महिलांची नांवे असून यातील लहान जाऊ ही कळमेश्वरातील वॉर्ड क्र.७ मध्ये राहते. तर मोठी जाऊ मंजू ही दत्तमंदिर रोड येथे भाड्याने राहते. या दुर्दैवी घटनामुळे सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मयत मोठी जाऊ मंजू ही आज आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास कळमेश्वर येथील बाजारात काही खरेदी करण्यासाठी आली होती. खरेदीझाल्यानंतर जवळच राहत असलेल्या छोट्या जाऊ अलका कडे घरी गेली त्यावेळी त्यावेळी मोठी जाऊ मंजूला अलका बाथरूम कडून येऊन बाथरूम मार्गावर कँण्हत असलेली दिसली त्यावेळी अलकाला जबरदस्त विधुत झटका पडला होता. मोठया जाऊला हे माहिती नव्हते त्यामुळे मोठी जाऊ मंजुने अलका ला स्पर्श केल्याने मोठी जाऊ सुद्धा तेथेच कोसळली बाथरूम परिसरात पाणी साचले असल्याने तेथेच आधीच जिवंत विधुत प्रवाह सुरू असल्याने दोघीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. छोटी जाऊ अलका हिच्या पतीचे अवघ्या दोन महिन्यापूर्वी मृत्यू झाला असून अलका ला 2 मुले आहेत. तर मोठी जाऊ मंजू ला 2 मुले आहेत. या दोघींची अत्यंत हलाखीची स्थिती आहे. एकाच घरी दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना कळमेश्वरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे नागरिकांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. या झालेल्या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.