प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संपूर्ण योजना जनतेच्या हितासाठी:-डॉ.मंगेश गुलवाडे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा पर्यावरण समिती तर्फे आयोजित गौरव विशेष प्रदर्शनीचा समारोपीय कार्यक्रम संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संपूर्ण योजना जनतेच्या हितासाठी:-डॉ.मंगेश गुलवाडे

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा पर्यावरण समिती तर्फे आयोजित गौरव विशेष प्रदर्शनीचा समारोपीय कार्यक्रम संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संपूर्ण योजना जनतेच्या हितासाठी:-डॉ.मंगेश गुलवाडे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा पर्यावरण समिती तर्फे आयोजित गौरव विशेष प्रदर्शनीचा समारोपीय कार्यक्रम संपन्न
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संपूर्ण योजना जनतेच्या हितासाठी:-डॉ.मंगेश गुलवाडे
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा पर्यावरण समिती तर्फे आयोजित गौरव विशेष प्रदर्शनीचा समारोपीय कार्यक्रम संपन्न

✍हनुमान चौखे✍
बाबूपेठ शहर प्रतिनिधी
74481 46747

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हा पर्यावरण समिती तर्फे विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात प्रधानमंत्री गौरव विशेष प्रदर्शनीचे आयोजन स्थानिक श्री गजाननराव बुरडकर सभागृहात 3 व 4 ऑक्टोबर ला करण्यात आले होते त्या प्रदर्शनीचा समारोपीय कार्यक्रम 4 ऑक्टोबर ला पार पडला समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संपुर्ण योजना ह्या जनतेच्या हिताच्या असून त्यांनी त्या योजना यशस्वीरित्या राबवून योजना पूर्ण केल्या व भारताला जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करून दिली असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हा पर्यावरण समितीच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गौरव विशेष प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांचे सादरीकरण केले त्यानंतर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांबाबत माहिती दिली तर ब्रिजभूषण पाझारे यांनी जिल्हा पर्यावरण समितीच्या कार्याचे कौतुक केले.
भाजपा उपाध्यक्षा भारती दुधानी यांनी स्पर्धेत जिंकणे किंवा हरने महत्वाचे नसून स्पर्धेत सहभाग घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हा पर्यावरण कार्यकारिणीच्या अध्यक्षा प्रीती भुषणवार व त्यांच्या चमूने योग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,योग समिती च्या जिल्हा प्रभारी स्मिता रेभनकर यांची ही उपस्थिती होती तर स्पर्धेत गणेश चवरे व वनिता चवरे यांनी स्मार्टसिटी प्रतिकृतीवर पहिला क्रमांक पटकाविला तर सिद्धी महिंद्रकर बेटी बचाओ बेटी पढाओ प्रतिकृतीवर दुसरा क्रमांक,कृष्णा बेंद्रे अमृत जल योजना प्रतिकृतीवर तिसरा क्रमांक पटकावला त्यासोबतच प्रोत्साहनपर बक्षिसे संजय सोनुने, पार्थ बागमारे, राहुल गोवर्धन अथर्व उपगनलावार,सत्यनारायण वर्मा,अलोक गुप्ता आशुतोष गौरशेट्टीवार,योगिता मित्तल, सानिका बैरम यांना देण्यात आले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हा पर्यावरण समितीचे महामंत्री अमित कासनगोतट्टूवार, उपाध्यक्ष प्रतीक तिवारी , कार्यक्रमाचे
संयोजक सुमित तिवारी, परीक्षित तिवारी,भाग्यश्री आपरेटवार,दत्ता पुरोहित ,महेश मूनरत्तीवार प्रणव भूषणवार यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन मंजूषा हलकारे तर आभार प्रदर्शन सुमित तिवारी यांनी केले……..