सात वर्षांत कच्च्या तेलात विक्रमी वाढ.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा ०६/१०/२१
वाढत्या महागाईत तेलाचा भडका अधिक उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सात वर्षांच्या विक्रमी पातळीवर आहे. अशा स्थितीत देशांतर्गत बाजारात पेट्रोेल आणि डिझेलच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांच्या चिंता वाढवत आहेत.
कच्च्या तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणार्या देशांची संघटना ओपेकची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत नोव्हेंबरमध्ये दररोज चार लाख पिंप उत्पादन वाढवण्यावर चर्चा झाली. पण, उत्पादन वाढूनही किमती वाढत आहेत. हळूहळू उत्पादन वाढल्याने किमती कमी होणार नाहीत. काही काळ थांबल्यानंतर, एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत पेट्रोलच्या किमतीत सहावेळा वाढ करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर डिझेलच्या किमतीत 10 दिवसांत 9 वेळा वाढ करण्यात आली आहे.