शाळेच्या मुख्याध्यापकानी केली विद्यार्थिनीशी अश्लील हरकत, बल्लारपूर तालुक्यातील केमरा-तुकम मधील प्रकार

शाळेच्या मुख्याध्यापकानी केली विद्यार्थिनीशी अश्लील हरकत, बल्लारपूर तालुक्यातील केमरा-तुकम मधील प्रकार

शाळेच्या मुख्याध्यापकानी केली विद्यार्थिनीशी अश्लील हरकत, बल्लारपूर तालुक्यातील केमरा-तुकम मधील प्रकार

✍️संतोष मेश्राम✍️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

बल्लारपूर:-  सविस्तर माहिती या प्रमाणे आहे की : देशभरात परसरलेल्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्च-२०२० पासून बंद असलेल्या शाळा सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात असल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने आज शहरी भागात ८ वी ते १२ वी तर ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याला मान्यता प्रदान केली या सूचनेला उद्देशून बल्लारपूर तालुक्यातील ही शाळा सुरू झाल्या मात्र आज पहिल्याच दिवशी बल्लारपूर तालुक्यातील केम-तुकुम येथील जिल्हा परिषद शाळेत गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला लाजवेल अशी निंदाजनक घटना घडली आज शाळा सुरू होताच बल्लारपूर तालुक्यातील केम-तुकुम येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भाऊराव तुंबडे यांनी वर्ग ५ वीच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले या घटनेची माहिती कळताच बल्लारपूर पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने अनर्थ टळला पोलिसांनी मुख्याध्यापकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असल्याची माहिती आहे. आज शाळेचा पहिला दिवस असल्याने अनेक विद्यार्थी शाळेत पोहोचले होते या घटनेतील विद्यार्थिनी वर्ग ५ वित शिकत होती.

या संदर्भातील अधिक माहितीनुसार वर्गातील ईतर विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात स्वच्छता करावयाची असल्याचे सांगून शाळेचा मुख्याध्यापक सदर विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करू लागला विद्यार्थिनीने या प्रकारचा विरोध करून सदर घटनेबाबत आपल्या आई-वडिलांना या घटनेची माहिती दिली असता गावकऱ्यांनी या शाळेच्या मुख्यध्यापकला बल्लरपुर पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली अशी माहिती आहे.