शिक्षक सूधाकर मडावी ठरले उत्कृष्ट शिक्षक, भंगाराम तळोधीत पुरस्कार सोहळा सपन्न.

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- शुरविर मल्हारराव होळकर बहुउध्देशिय संस्थे तर्फे दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे मानकरी सूधाकर मडावी ठरले.शाळाप्रवेशोत्सव तथा पुरस्कार सोहळ्यात मडावी यांना पुरस्कार प्रधान केला गेला.मडावी हे भंगाराम तळोधी येथिल जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत.
शुरवीर मल्हारराव होळकर बहुउध्देशीय संस्था भंगाराम तळोधी तर्फे दरवर्षी शिक्षकांचा सन्मान केला जातो. उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने त्यांचा गौरव केला जातो.यावर्षी या पुरस्कारासाठी सूधाकर मडावी यांची निवड करण्यात आली.सोमवारला झालेल्या सोहळ्यात मडावी यांना पुरस्कार प्रधान करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी अमर बोडलावार, लक्ष्मीताई बालुगवार, सूरेंद्र धाबर्डे, संजय गोविंदवार, भानेश कंकलवार, लक्ष्मण येग्गेवार उपस्थित होते. या पुरस्काराने मला बळ मिळाले. भविष्यात माझ्या हातून विध्यार्थी घडवितांना जराही कसूर होणार नाही, असे सूधारकर मडावी म्हणाले. पुस्तक व पुष्प देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुशांत निमकर यांनी केले तर तानाजी अल्लीवार यांनी मानले.