वंचित बहुजन आघाडी नागभिड कार्यकर्ता बैठक

वंचित बहुजन आघाडी नागभिड कार्यकर्ता बैठक

वंचित बहुजन आघाडी नागभिड कार्यकर्ता बैठक
वंचित बहुजन आघाडी नागभिड कार्यकर्ता बैठक

मुकेश शेंडे
तालुका प्रतिनिधि, सिंदेवाही
9011851745
मिडिया वार्ता न्यूज़

आज मंगळवार दि. 05 ऑक्टोबर 2021 ला दुपारी 12.00 वा. शासकिय विश्राम गृह नागभिड येथे वंचित बहुजन आघाडी ता. नागभिड च्या संपुर्ण कार्यकर्ता आणि पदाधिकारी, तालुका निरीक्षक मा. मधूकरजी उराडे आणि जिल्हा सदस्य अश्विनजी मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली सभा संपन्न झाली.
सदर बैठकीत निरनिराळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. काही दिवसांनी होत असलेल्या नगरपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, आणि जिल्हा परिषद निवडणुका बाबत चर्चा करण्यात आली. यात तालुका निरीक्षक उराडे साहेब यांनी जिल्हा परिषद क्षेत्र आणि पंचायत समिती क्षेत्रा साठी योग्य ती कार्यपद्धती सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना समजावून दिले. यानंतर होत असलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा चे नियोजन करण्यात आले.
आजच्या या सभेला संपुर्ण नागभिड तालुका वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष मा. खेमदेवजी गेडाम, ता. महासचिव मा. शैलेंद्र बारसागडे, जेष्ट महिला कार्यकर्त्या श्रीमती अनुसयाबाई रामटेके (जयभिम बाई), महिला महासचिव सौ. नंदिनीताई बारसागडे, माजी अध्यक्ष राजकुमार मेश्राम, शहर अध्यक्ष माणिकरावजी दोहींतरे, चंद्रभानजी रामटेके, सदानंद डेकाटे, पुष्पाताई डेकाटे, प्रशांत बांबोळे, किशोर मेंढे, सुभाष रामटेके, प्रकाश वाकडे, रविंद्र खोब्रागडे, वासुदेव सोनवाने, मनोहर ओरके, अरुण जीवने, केशव मेश्राम, दामले साहेब, काशिनाथजी शामकुळे, निमराव मेश्राम, मनोहर खोब्रागडे, आनंद मेश्राम पत्रकार, लोकनाथ मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.