जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काँग्रेस विजयी.

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी मो.नं-9822724136
सावनेर-06ऑक्टोंबर2021
नागपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या उपचुनाव मध्ये मंत्री केदार यांचा विजय तर भाजपाची घसरगुंडी.
सावनेर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सकाळी 10 वा.मत गणनेला सुरुवात झाली.केळवद सर्कल मध्ये जिल्हा परिषद चे उमेदवार सुमित्रा कुंभारे (काँग्रेस) यांना 8802 मते मिळाली तर भाजपाचे संगीता मुलमुले 7564 मते मिळाली.मिळालेल्या मतानुसार चुनाव अधिकाऱ्यांनी सुमित्रा कुंभारे काँग्रेस 1338 मतांनी त्यांना विजयी घोषित केले.वाकोडी सर्कलमधून जिल्हा परिषद उमेदवार ज्योती शिरस्कर (काँग्रेस) यांना 8653 मते मिळाले तर भाजपाचे आयुषी धपके यांना 6009 मते मिळाली.काँग्रेसचे उमेदवार ज्योती शिरस्कर 2644 मतांनी त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
तसेच सावनेर तालुक्यातील पंचायत समिती उपचुनाव मध्ये (1) वाघोडा पंचायत समिती मधून उमेदवार ममता केसरे (काँग्रेस) विजयी.
(2) नांदा पंचायत समिती मधून उमेदवार गोविंद ठाकरे (काँग्रेस) यांना 4366 मते मिळाली.तसेच भाजपाचे उमेदवार माणिक बलकी यांना 3409 मते मिळाली. इथे गोविंदा ठाकरे काँग्रेस यांना. विजयी घोषित करण्यात आले.
(3) बडेगाव पंचायत समिती मधून भावना चिखले (काँग्रेस) यांना 3664 मते मिळाली.तसेच भाजपाचे उमेदवार जयश्री चौधरी यांना 2869 मते मिळाले. काँग्रेसच्या भावना चिखले यांना विजयी उमेदवार घोषित करण्यात आले.निवडणुकीचे निकाल जाहीर होताच
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खुशीचे वातावरण होते तर बीजेपी चे कार्यकर्ता शांत होते.