घरकुल विभाग अभियंत्यावर निलंबनाची कारवाई • ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आर्थिक त्रास देणे भोवले

घरकुल विभाग अभियंत्यावर निलंबनाची कारवाई

• ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आर्थिक त्रास देणे भोवले

घरकुल विभाग अभियंत्यावर निलंबनाची कारवाई • ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आर्थिक त्रास देणे भोवले

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

सिंदेवाही : 6 ऑक्टोंबर
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत पंचायत समिती सिंदेवाही येथे घरकुल विभागात ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, मनोज देशमुख याच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. मनोज देशमुख हा अनेक दिवसापासून सिंदेवाही येथे घरकुल विभागात ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून कार्यरत होता. देशमुख हा सतत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आर्थिक त्रास देण्याचे काम करीत होता अश्या अनेक तक्रारी प्रकल्प कार्यालयाला प्राप्त होताच, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा कार्यालय, चंद्रपूर यांनी देशमुख ह्याला तडकाफडकी निलंबित केले असल्याचे पत्र पंचायत समितीला प्राप्त झाले. ग्रामीण भागातील घरकुल योजनेचे तांत्रिक पर्यवेक्षण , नियंत्रण, आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून पंचायत समिती मधील घरकुल विभागात इंजिनियर ची नियुक्त करण्यात येते. यानुसार सिंदेवाही पंचायत समिती मध्ये मनोज देशमुख आणि स्वप्नील कायरकर, हे दोन व्यक्ती कार्यरत होते. यापैकी मनोज देशमुख हा सतत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आर्थिक त्रास देण्याचे काम करीत असे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी अभियंता मनोज देशमुख याची कानउघडणी केली होती. त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय चे प्रकल्प संचालक डॉ.सुभाष पवार यांनी अभियंता मनोज देशमुख याला तडकाफडकी निलंबित केले असून याबाबतचे पत्र पंचायत समिती कार्यालय सिंदेवाही येथे प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोणत्याही घरकुलच्या लाभार्थ्यांनी इंजिनियर मनोज देशमुख यांचे सोबत संपर्क करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here