मा.श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार श्री महेश जी केदारी गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली ब्रूक मल्लमपल्ली होऊ द्या चर्चा, करूया सरकारच्या बोल घेवड्या योजनाच्या भांडाफोड . (श्री रियाज शेख जिल्हाप्रमुख)
मारोती काबंऴे
मीडिया वार्ता न्यूज
गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मों.नं.9405720593
अहेरी : -अहेरी विधानसभा क्षेत्रातील ब्रूक मल्लमपल्ली येथे 4 ऑक्टोबर 2023 सायंकाळी होऊ द्या चर्चा करूया सरकारच्या बोल घेवड्या योजनाच्या भांडाफोड उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमात श्री रियाज शेख जिल्हाप्रमुखअहेरी विधानसभा यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली श्री शिवाजीराव खोडदे पाटील विधानसभा संपर्कप्रमुख श्री विलास भाऊ सिडाम नगरपंचायत सदस्य अहेरी सौ. चंदनाताई बिश्नोई उपजिल्हा संघटिका अहेरी विधानसभा प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्री रियाज शेख जिल्हाप्रमुख उपस्थित नागरिकांना संवाद साधताना केंद्र शासन व राज्य शासन केवळ कागदावर *भुलभुलय्या* योजना राबवित आहे केवळ प्रसिद्धी करून जनतेला लॉलीपॉप देण्यात येत असल्याने याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होत नसून उलट जनतेमध्ये शासनाच्या विरोधात रोष निर्माण होत आहे. गोरगरीब लोकाकरिता अनेक योजना असतानाही त्या योजना चा लाभ जनतेला मिळत नसेल तर त्या योजनाच्या काय फायदा एकीकडे केंद्र शासन व राज्य शासन *सब का साथ सब का विकास असा शाब्दिक नारा देऊन सत्तेत आले आणि जनतेला दिलेले वचन विसरले सब का साथ बीजेपी का विकास* आज सत्तेत बसलेले पुढारी जनतेला वाऱ्यावर सोडलेले आहे सध्याच्या परिस्थितीत महागाई सतत वाढत असल्याने गोरगरीब लोकांचे जीवन जगणे कठीण झालेले आहे झपाट्याने बेरोजगारी वाढत असल्याने बेरोजगार युवकांमध्ये नाराजगीचा सूर शासनाविरुद्ध दिवसेंदिवस वाढत असल्याचे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले प्रमुख अतिथी श्री विलास सिडाम यांनी प्रास्ताविक भाषणात मागील अनेक वर्षापासून अल्लापल्ली ते शिरोंचा महामार्ग रस्त्याची अवस्था बिकट असल्याने वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यामुळे लोकांनी घेणे जाने तेलंगाना मार्गाने जाऊन राहिले या अल्लापल्ली शिरोंचा मार्गावर अनेक अपघात होऊन अनेक लोकांचे जिओ गमावलेले असतानाही सरकार गंभीर नाही अहेरी अल्लापल्ली रस्त्याचे उद्घाटन होऊ नये रस्त्याचे काम अजून पर्यंत सुरू झालेले नाही ठेकेदारांची मनमानी मुळे जनता त्रस्त झालेली आहे रस्त्यात अनेक खड्डे पडल्यामुळे अवघ्या सात किलोमीटरच्या प्रवास अर्धा एक तास लागून राहिला कोणी कुणाच्या वाली नाही लोकप्रतिनिधीचे दुर्लक्षामुळे अधिकारी वर्ग जनतेची समस्या ऐकायला तयार नाही यासाठी जनतेने एकजूट होऊन विविध समस्या साठी आंदोलन हाच एकमेव पर्याय आहे असे नगरपंचायत सदस्य विलास भाऊ सिडाम यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच चंदना बिश्नोई शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटिका महिलांनी सुद्धा अहेरी विधानसभाच्या विकासासाठी महिलांच्या हक्कासाठी महिला समोर येणे अत्यंत गरजेचे आहे असे मत व्यक्त या होऊद्या चर्चा या कार्यक्रमात बहुमूल्य मार्गदर्शन केल्या होऊ द्या चर्चा या मोहिमा अंतर्गत सायरोबा ना जलील शेख रेश्मा पठाण समका गावडे रामबाई गावडे बक्काबाई गावडे प्रेमीला ताई गावडे महमूद पठाण उत्तम उराडे संभाजी जगन्नाथ जीवन मंडळ सुमित्रा मंडळ शुभम गावडे संजू गावडे राजू गावडे नागम्मा केदारी असे अनेक नागरिकांनी या कार्यक्रमात भाग घेतला कार्यक्रमाच्या शेवटी *जय भवानी जय शिवाजी उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है आदित्य साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है जय घोषणा यावेळी करण्यात आले*.