खारेपाट विभागामध्ये शिवसेनेचा महिला मेळावा संपन्न

खारेपाट विभागामध्ये शिवसेनेचा महिला मेळावा संपन्न

खारेपाट विभागामध्ये शिवसेनेचा महिला मेळावा संपन्न

हजारो महिलांची संवाद मेळाव्याला उपस्थिती

खारेपाट विभागामध्ये शिवसेनेचा महिला मेळावा संपन्न
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: कुर्डूस व शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलाचा संवाद मेळावा हॉटेल पाटील ब्रदर्स, पांडवादेवी, पोयनाड येथे पार पडला. बहुसंख्य महिला भगिनींनी उपस्थित राहून स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेची ताकद दाखवून दिली. महिला भगिनींचा सन्मान म्हणून या वेळी साडी वाटप करण्यात आले.
काही दिवसांपुर्वीच शेकापच्या महिला नेतृत्वाने कुर्डुस परिसरातील तरुणांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. या विधानाने येथील महिला देखील संतत्प झाल्या होत्या. त्यानंतर चार दिवसातच येथील हजारो महिलांनी शेकापला रामराम ठोकत अलिबाग- मुरुडचे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
कुर्डुस-शहापुर हा जिल्हा परिषदेचा मतदार संघ शेकापसाठी सर्वात सुरक्षित मानला जात आसे, परंतु शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी रविवार (ता.६) झालेल्या भव्य कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी, यांच्या उपस्थित महिलांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. ऐण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेकापच्या अस्तित्वासाठी हा पक्षप्रवेश धोक्याचा इशारा समजला जात आहे.

यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी म्हणाल्या, आमच्या मुलाबालांच्या चारित्र्यावर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. निवडणुका आल्यावर आम्हाला किती अपुलकी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न शेकापच्या नेत्या करीत आहेत. वीज, पाणी, रस्ते, रोजगार असे अनेक प्रश्न असताना शेकापच्या नेत्या कुर्डुस-शहापुर या मतदार संघात कधीही फिरकल्या नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिला पायपीट करीत असताना शेकापच्या नेत्यांनी त्यांची कधीही आठवण झालेली नाही. अशा नेत्यांना येथील महिलांनीच जागा दाखवावी, असेही आवाहन मानसी दळवी यांनी केले. यावेळी अलिबाग-मुरुड विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी यांनीही तुमच्यावर कोणतेही संकट आले तर मी पाठीमागे भावाप्रमाणे खंबीर उभा राहिन, असे आश्वासन दिले.
या वेळी जिल्हा अध्यक्ष राजा केणी,जिल्हा संपर्क संघटिका संजिवनी नाईक, उपसरपंच रसिकाताई केणी, जिल्हा महिला प्रमुख तृप्ती ताई, तालुका प्रमुख भाग्यश्री नंदन पाटील, संघटक जिवन पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे, मधुशेठ पाटील, रेश्मा जोशी, संकेत पाटील, सचिन धुमाळ, शैलेश पाटील, विभाग प्रमुख स्वप्नील म्हात्रे, अक्षय पाटील आदी सहकारी आणि मान्यवर उपस्थित होते.