महिलांची शक्ती लक्षात घेवून संघटित व्हा
ज्येष्ठ विधीज्ञ ॲड निळा तुळपुळे
चिंचवली-नारंगी आदिवासीवाडी येथे विधी साक्षरता शिबिर
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: महिलांची शक्ती काय असते हे लक्षात घेऊन तुम्ही संघटीत रहाणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड नीळा तुळपुळे यांनी केले. रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने चिंचवली-नारंगी आदिवासीवाडी येथे विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश अमोल शिंदे अध्यक्षस्थानी तर अधीक्षक प्रणिता मगर उपस्थित होते.
ज्येष्ठ विधीज्ञ ॲड नीळा तुळपुळे यांनी मार्गदर्शन करताना महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे पण बाहेर पडल्यावर पुरुषांपासून संरक्षण मिळण्यासाठी काय केले पाहिजे ते सांगितले.
वाडीवर एखादया मुलीवर प्रसंग आला तर काय करावे हे माहित असायला पाहिजे. महिलांची शक्ती काय असते हे सांगून तुम्ही संघटीत रहाणे गरजेचे आहे असे ॲड नीळा तुळपुळे यांनी सांगितले. महिलांसाठी कोणते कायदे आहेत हे समजावून सांगितले.
रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश अमोल शिंदे यांनी मार्गदर्शन करताना लहान वयात लग्न करू नये असे प्रतिपादन केले. लहान वयात मुलीचे लग्न झाल्यानंतर काय दुष्परिणाम होतात हे समजावून सांगितले त्यासाठी 18 वर्षानंतर लग्न केले पाहिजे व मुलाचे वय 21 झाल्याशिवाय लग्न करू नये. मुलींना चांगले शिक्षण दिले तर त्यांना आरक्षणा मध्ये चांगली नोकरी लागू शकते. त्यासाठी लवकर लग्न करायची पद्धत सोडून दिली पाहिजे असेही सांगितले. महिलांसाठी कोणत्या योजना आहेत हे समजावून सांगितले. जिल्हा विधी प्राधिकरणाच्या वतीने महिलांना मोफत वकील मिळतो हे सांगितले.
रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश अमोल शिंदे यांचे स्वागत ॲड निळा तुळपुळे यांनी केले. प्रस्तावना रश्मी ठाकुर यांनी केले.