नारडा येथील स्वस्त धान्य दुकानवर वाटपात अनियमिततेचा ठपका

नारडा येथील स्वस्त धान्य दुकानवर वाटपात अनियमिततेचा ठपका

नारडा येथील स्वस्त धान्य दुकानवर वाटपात अनियमिततेचा ठपका

नारड्यातील दुकान वनोजातील दुकानाला वर्ग

नारडा येथील स्वस्त धान्य दुकानवर वाटपात अनियमिततेचा ठपका

कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे
मो.9923358970

कोरपना :- तालुक्यातील नारंडा येथील स्वस्त धान्य दुकानदार कडून शिधापत्रिका धारकाची फसवणूक करून धान्याचा काळाबाजार करीत असल्याची गम्भीर तक्रार आहे.

या संबंधाने येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना तक्रार केली होती. या संबंधाने पुरवठा निरीक्षण अधिकारी कोरपना यांनी चौकशी केली असता. तात्काळ कारवाई होणे अपेक्षित असल्याने येथील रास्त भाव दुकान तात्पुरत्या स्वरूपात वनोजा येथील रास्त भाव दुकान यांना जोडण्यात आले आहे.

मौजा नारंडा येथील रास्त भाव दुकानदार हे नियमाप्रमाणे स्वस्त धान्य दुकान चालवीत नाही. दुकानात साठा फलक व भाव फलक लावण्यात आला नाही. मोफत धान्य असताना धान्य कमी आले आले म्हणून नेहमीच धान्य कमी वाटप करण्यात येते, पास मशीन बिल ग्राहकांना दिल्या जात नाही, धान्य देण्यापूर्वी नेट नाही म्हणून थंब घेतल्या जाते व नंतर तूम्ही धान्य घेऊन जा म्हणून ग्राहकांना वापस केले जाते, तसेच काटा पासिंग करण्यात आला नाही नेहमीच पंचिंग करून धान्य बरोबर दिल्या जात नाही आदी तक्रारी एका निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांनी केल्या होत्या.

या संबंधाने तहसीलदार कोरपना यांनी विकी देवघरे निरीक्षण अधिकारी कोरपना यांना चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच त्यांनी या संबंधाने सखोल चौकशी सुद्धा करून अहवाल सादर केला.त्याची तात्काळ अंमलबजावणी करत स्वस्त धान्य दुकान वनोजा येथील स्वस्त धान्य दुकानाला तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आले आहे. यावर रास्त भाव दुकान तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई न करता या रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावा अशी मागणी शिधापात्रधारकाकडून होत आहे.

प्रतिक्रिया

प्राप्त तक्रारीवरून , तहसीलदार कोरपना यांच्या आदेशावरून स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करण्यात आली आहे. यात अनियमिता आढळून आल्या आहे. या अनुषंगाने चौकशी अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला आहे. सद्यस्थितीत नारंडा येथील दुकान वनोजा येथील दुकानाला हस्तांतरित करण्यात आले आहे.

– विकी देवघरे
– निरीक्षण अधिकारी, कोरपना