राणी दुर्गावती जयंतीनिमित्त महिलांना कर्ज मंजुरी आदेश वाटप

6

राणी दुर्गावती जयंती निमित्त महिलांना कर्ज मंजुरी आदेश वाटप

अरविंद बेंडगा

जिल्हा प्रतिनिधी पालघर

मो: 77981885755

पालघर :- राणी दुर्गावती जयंती निमित्त शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., शाखा कार्यालय जव्हार (कोंकण विभाग) यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महामंडळाच्या महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत पात्र 7 लाभार्थी महिलांना वैयक्तिक व्यवसायिक कर्जांचे मंजुरी आदेश वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री.योगेश पाटील यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शबरी महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्री.राजेश पवार यांनी केले तसेच आदिवासी महिला उद्योजिका उपस्थित होत्या.

राणी दुर्गावती यांची प्रतिमा पूजन उपस्थित महिला प्रतिनिधी यांनी केले.

या कार्यक्रमात राणी दुर्गावती यांच्या कार्यावर व योगदानावर तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देण्यात आला. शबरी महामंडळाच्या योजनांद्वारे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कर्ज वितरणाद्वारे लघु उद्योग, व्यवसाय, कृषीपूरक व्यवसाय व सेवाक्षेत्रात महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे.

कार्यक्रमात 7 महिलांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे कर्ज मंजुरी आदेश प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे आदिवासी भागातील महिलांना आर्थिक आधार मिळून त्यांचा आत्मविश्वास व उद्योजकतेचा विकास होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिलांना योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.गोविंदा साळुंके यांनी केले