श्री समर्थ कृपा वृद्धाश्रमात साजरा केला आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन…

9

श्री समर्थ कृपा वृद्धाश्रमात साजरा केला आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन…

श्री समर्थ कृपा वृद्धाश्रमात साजरा केला आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन...

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:
मेरा युवा भारत रायगड अलिबाग यांच्या अंतर्गत प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग स्वयंसिद्ध सामाजिक विकास संस्था रोहा व स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत रायगडचे अमित पुंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परहूर येथील श्री समर्थ कृपा वृद्धाश्रमात नागरिकांसोबत संवाद साधण्यात आला यावेळी श्री समर्थ कृपा वृद्धाश्रमाचे संचालक ॲड. जयेंद्र गुंजाळ यांनी या आश्रमाविषयी माहिती दिली तर लायन अँड. डॉ. निहा अनिस राऊत यांनी वृद्धांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहावे याकरिता मार्गदर्शन केले तसेचवअँड. कला ताई पाटील यांनी संगीतातून सर्वांना मंत्रमुग्ध करून जीवन कसे आनंदाने भरभरून जगावे याविषयी मौल्यवान मार्गदर्शन केले त्याचबरोबरतपस्वी गोंधळी प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार यांनी युवक युवतींनी आपण समाजाचे देणे लागतो ही भावना जपत समाजासाठी आपल्या परीने जे शक्य होईल ते सहाय्य करणे गरजेचे आहे तर जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व अँड.. जयेंद्र गुंजाळ करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले यावेळी अलविना आयझॅक मॅडम देखील उपस्थित होत्या त्याचबरोबर स्पर्धा विश्व अकॅडमीच्या युवती आवर्जून उपस्थित होत्या यावेळी अकॅडमीतील प्रणाली तळेगावकर हिचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.