यवतमाळ मुर्तीजापूर–कारंजा मार्गावर अपघातात युवक ठार.
यवतमाळ:- जिल्ह्यातील मुर्तीजापूर-कारंजा मार्गावर मालवाहु वाहनाच्या धडकेत यवतमाळ जिल्ह्यातील सावरगाव येथील निलेश मधूकर काळे (२४ ) नामक दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना उमरी अरब गावाजवळ बुधवारी दुपारी ४.३० वाजताचे सुमारास घडली.
तालुक्यातील कारंजा मार्गावरील उमरी अरब येथील उमा नदी पुलावर कारंजा वरून मूर्तिजापूरकडे येणाऱ्या एमएच ३० डीबी २८३० या मालवाहू वाहनाने एमएच २९ बीए ४६२३ या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार निलेश मधूकर काळे (२४) रा. सावरगाव जिल्हा यवतमाळ याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो घटनास्थळीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.