नागरिकांच्या सुरक्षेत वाहतूक पोलिसांचे मोठे योगदान-डॉ.मंगेश गुलवाडे भारतीय जनता पार्टी बंगाली आघाडी चंद्रपूर महानगरच्या वतीने दिवाळी निमित्य वाहतूक पोलिसांना मिठाई वितरणाचा कार्यक्रम संपन्न

50

नागरिकांच्या सुरक्षेत वाहतूक पोलिसांचे मोठे योगदान-डॉ.मंगेश गुलवाडे

भारतीय जनता पार्टी बंगाली आघाडी चंद्रपूर महानगरच्या वतीने दिवाळी निमित्य वाहतूक पोलिसांना मिठाई वितरणाचा कार्यक्रम संपन्न

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
8208166961

चंद्रपूर : – भारतीय जनता पार्टी बंगाली आघाडी महानगर चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्य मिठाई वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की नागरिक आज रस्त्यांवर सुरक्षित वाहतूक करू शकतात ते फक्त आणि फक्त वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांनमुळे ऊन,पाऊस,थंडी कशाचीही पर्वा न करता वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत असतात त्यांच्या या कार्यामुळेच सामान्य नागरिक सुरक्षेसह वाहतूक करू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प चौक, सावरकर चौक, प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक, छोटा बाजार, जनता काॅलेज इत्यादी ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मिठाईचे वितरण करण्यात आले,सदर कार्यक्रमात कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ.दीपक भट्टाचार्य,महामंत्री मनोरंजन रॉय,कृष्णकांत पोद्दार,कृष्णा कुंडू, डॉ.दीपक बिश्वास,बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, भाजपा महानगर सचिव रामकुमार आक्कापल्लीवार,उपाध्यक्ष डॉ नितीन बिश्वास, सौ कविता सरकार, बिदेश शहा, सचिव प्रदीप बाला,अविनाश घरामी, रोहित बिश्वास, परितोष मिस्त्री,उमेश आष्टनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.