युवा संकल्प संस्था ग्रूप महाराष्ट्र राज्य शाखा चामोर्शी तर्फे 15 जनावरांवर औषधोपचार

✒धनराज आर वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी
*चामोर्शी :* शहरातील वाळवंटी चौकात पशुपालकांकच्या 15 जनावरांवर औषधोपचार करण्यात आले. शहरातील जनावरांना चौखूरा, मोहोळ यासारख्या विविध आजारांचा संसर्ग वाढत असल्याची माहिती युवा संकल्प चामोर्शी ग्रूपचे प्रमुख सुरज नैताम यांना मिळताच त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वाळवंटी चौक चामोर्शी येथे पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 15 जनावरांवर औषध उपचार करण्यात आले. या शिबिरात शेळ्या, म्हशी, बैलांवर औषध उपचार करण्यात आले. यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रामकृष्ण देवकुळे, पशुधन पर्यवेक्षक महेश पुठावार, प्रीतम गेडाम, श्यामराव वासेकर, मारुती वासेकर, देवराव नैताम, शरद बुरांडे, युवा संकल्प चामोर्शी ग्रुप प्रमुख सुरज नैताम, सदस्य राहुल चिचघरे, प्रशिक नंदेश्वर, अजय भांडेकर उपस्थित होते.