सावधान …! शेतातून चोरटें पळवत आहे दुचाकी

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
लाडकी : -हिंगणघाट येथिल रहिवाशी श्री. संतोष किसनाजी येनोरकर, लाडकी जिह्वा. वर्धा येथे त्यांची शेतजमीन आहे, तीथे ते शेतात एकटेच ०३-१०-२०२१ रोजी शेतजमिनीच्या कडेने (शेताच्या धुऱ्यावर ) गाडी (TVS ज्युपिटर क्लासिक No. MH32 AN1697) लावुन शेतात कामाला गेले आणि नंतर परत आले असता त्यांची गाडी तिथे नव्हती ,त्यांनी सर्वीकडे शोधाशोध सुरु केली,लाडकी गावात पण शोधून सापडली नाही, त्यांना मिळाली नाही. कारण ती चोरिला गेली होती. हि घटना दुपारी १२ ते 1.०० दुपारी च्या सुमारास घडली. दुपारी २. ३० ला श्री. संतोष येणोरकर यांनी हिंगणघाट येथील पोलीस स्टेशन घाठले ,परंतु त्या दिवशी तिथे त्यांच्या गाडीची चोरीची रिपोर्ट नोंद झाली नाही. ०४-१०-२०२१ रोजी परत पोलीस स्टेशन ला जाऊन त्यांनी चोरीची तक्रार नोंद केली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
श्री. संतोष येनोरकर हे मोहता मिल, हिंगणघाट येथे कामाला आहे, परंतू मागिल वर्षापासुन मिल बंद झाले आणि पगार सुद्धा बंद झाला , त्यामुळे त्यांनी यावर्षी स्वतःची शेती करायचे ठरवले .शेतीकाम हेच पर्याय उरले आहे. नेहमी प्रमाणे त्या दिवशी सुद्धा शेताचे कामाला गाडी घेऊन एकटेच गेले होते. परंतु चोराने वेळ साधून दिवाळी च्या दिवसाला गाडी लंपास केली असे दिसून येते. आता त्यांची आशा आहे कि त्यांना चोरी झालेली गाडी लवकर परत मिळावी. आणि पोलिसांनी लवकरात लवकर चोरी करणाऱ्याला पकडावे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.