एकाच झाडाला दोन गळाफास, एकावर मृतदेह लटकला तर दुसरा गळफास रिकाम्या.

✒मीडिया वार्ता न्यूज✒
गोंदिया :- गोंदीया जिल्हातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आली आहे. त्यामूळे सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रात्रीच्या सुमारास 25 वर्षीय युवकाने गळफास घेत आपल जिवन संपवलं. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील फुटाना गावात घडली आहे. कैलास रामलाल कोचे असे मयत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे एकाच फांदीला वेगवेगळ्या दोन दोरींचे दोन गळफास असल्याने दोघे जण एकाच वेळी आत्महत्या करत असल्याच्या शंकेला उधाण आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील फुटाना गावात राहणारा 25 वर्षीय कैलास दिवाळीच्या दिवशी कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता घरुन निघून गेला होता. रात्री जवळपास दोन वाजताच्या सुमारास तो घराबाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळ होऊन गेल्यानंतरही तो घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली, त्यावेळी फुटाना ते कलुसावटोला पायदान रस्त्यालगत असलेल्या जांभळीच्या झाडावर कैलास गळफास घेतलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळून आला.
एकाच झाडाला दोन फास
विशेष म्हणजे ज्या जांभळाच्या झाडाच्या फांदीवर तरुणाने गळफास घेतला, त्या फांदीला वेगवेगळ्या दोन दोरीने दोन गळफास बांधलेले होते. त्यापैकी एकाला मृतक कैलास कोचे याचा मृतदेह लटकलेला होता तर दुसरा गळफास रिकाम्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळून आला. तसेच त्याचा मोबाईल खिशात न ठेवता झाडाखाली ठेवलेला होता.
कैलाससोबत कोणी माघार घेतली, गावात चर्चा त्यामुळे कैलाससोबत आत्महत्या करणारी आणखी कोणी व्यक्ती होती का, असल्यास कोण, अशा एक ना अनेक चर्चा गावात सुरु झाल्या आहे. याबाबत पोलीस स्टेशन चिचगड येथे फिर्याद नोंद करण्यात आली असून फौजदारी कलम 174 अन्वये पुढील तपास चिचगड पोलिस करीत आहेत.