नागपुर: घरासमोर बसल्यामुळे कृख्यात गुंडयाच्या खून, नागपुरात खुनी सत्र कायम.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 95275 26914 📲
नागपूर:- सर्वत्र दिवाळीचा उत्साहा असताना नागपुरात एका हत्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास नागपुरात एका कृख्यात गुंडाच्या खुणची थरारक घटना समोर आली आहे. घराबाहेर बसल्याच्या रागातून संबंधित गुंड प्रवृत्तीच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यशोधरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
जफर अब्बास बरकत अली असं हत्या झालेल्या गुंडाचं नाव असून तो नागपूर जिल्ह्याच्या कामठी येथील रहिवासी आहे. मृत जफर हा कामठी परिसरातील गुंड असून त्याच्याविरोधात बरेच गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी मध्यरात्री जफर हा आरोपीच्या घरासमोर बसला होता. बराच वेळ घरासमोर बसल्याने आरोपीनं त्याला हटकलं. घरासमोर बसल्याच्या कारणातून दोघांमधील वादाला ठिणगी पडली. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला.
यामुळे संतापलेल्या आरोपीनं जफर याची निर्घृण पद्धतीने खून केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या खुणाच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती यशोधरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृत गुंडाचा मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी नागपुरात एका कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. एका टोळक्यासोबत झालेल्या वादानंतर संबंधित गुंडाची हत्या करण्यात आली होती. संबंधित गुंडाचं नाव फ्रँक अँथनी असं होतं. फ्रँक हा नागपुरातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात हत्येचे गुन्हे दाखल होते. फ्रॅंकच्या हत्येची घटना ताजी असताना नागपुरात आणखी एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात दहशतीच वातावरण निर्माण झालं आहे.