कर्जत तालुक्यात कार्य सम्राट आमदार महेंद्र थोरवेच यांनी जिंकला गड
सात पैकी सहा ग्रामपंचायतीवर शिंदे शिवसेनाचा भगवा……
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞
दि. ५ नोहेंबर २०२३ रोजी झालेल्या निवडणुकांचे निकाल लागला त्यात कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायत विभागामध्ये विकास कामाच्या जोरावर आमदार महेंद्र थोरवे यांनी सहा ग्रामपंचायत वर शिंदे गटाचा वर्चस्व सिद्ध केलं आहे.
सात पैकी नारसारापूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे थेट सरपंच निवडून आले तर सहा जागेवर कार्यसम्राट आमदार थोरवे यांनी गड जिंकला आहे.
मतदारांनी आम्हाला कौल म्हणजे करोडो रुपयांचा निधी या तालुक्यात आणून आम्ही विकास साधला आहे. म्हणून विकास कामांना प्राधान्य देऊन आमचा दणदणीत विजय प्राप्त झाला असून सर्व श्रेय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर, भाई गायकर, संभाजी जगताप, शिवराम बदे, त्याच प्रमाणे इतर शिवसेनेचे पदधिकारी, सुवा सेना, महिला आघाडी यांचे असल्याचे मत आमदार थोरवे यांनी व्यक्त केले.