राजकीय कट्टा विशेष: ओबिसी चेहरा ‘राजेश बेलेंची’ दमदार एंट्री, चंद्रपुर-वणी-आर्णी क्षेत्राचे समीकरण बदलणार! 

52

आगामी लोकसभेचं काऊंटडाऊन सुरू: ओबिसी चेहरा ‘राजेश बेलेंची’ दमदार एंट्री, चंद्रपुर-वणी-आर्णी क्षेत्राचे समीकरण बदलणार!

 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर, ७ नोव्हेंबर: देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीची उलट मोजणी सुरू झाली असून चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात देखील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या क्षेत्रात हंसराज अहीर, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, विनायक बांगडे अश्या दिग्गज नावांसह युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.अश्यातच ‘राजेश बेले’ हे नाव चांगलेच चर्चेत आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजेश बेले यांचे नाव या क्षेत्रात चर्चिले जात आहे. बेले यांनी सुद्धा या निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार आगमनाची तयारी दर्शविली असून त्यांनी आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू करून आगमनाची तयारी निश्चित केली आहे.

राजेश बेले यांनी चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा क्षेत्रातून उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी नुकतेच चंद्रपूर शहरातील विविध भागात जाऊन जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या जनसंपर्कातून त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

त्यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपुर-वणी- आर्णी लोकसभा क्षेत्रातील निवडणूक यावेळी चुरशीची होऊन चंद्रपुर-वणी- आर्णी लोकसभा क्षेत्रातील निवडणुकींच्या परिणामात बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यात राजेश बेले यांचे नाव अग्रणी आहे. पर्यावरण बचावासाठी संजीवनी पर्यावरण संस्थेची स्थापना तसेच विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडन्याचे काम राजेश बेले नेहमीच करत असतात. प्रदूषण, भ्रष्टाचार, बेरोजगारी यासारख्या विविध समस्यांवर त्यांनी सामाजिक आंदोलने केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे जनसामान्य लोकांत त्यांची ‘जनसेवक’ अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.

राजेश बेले हे ओबीसी समाजातील असून चंद्रपुर लोकसभा क्षेत्रात ओबीसी समाजाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राजेश बेले यांच्या उमेदवारीला ओबीसी समाजातून चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

राजेश बेले हे तेली समाजातील एक तरुण आणि कर्तृत्ववान नेते आहेत. त्यांना सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आहे. तेली समाजातील विविध उपक्रमात नेहमीच त्यांचा मोठा वाटा असतो.