चंद्रपुरात सर्जीकल ब्लेडने वार करत हत्येचा प्रयत्न

चंद्रपुरात सर्जीकल ब्लेडने वार करत हत्येचा प्रयत्न

चंद्रपुरात सर्जीकल ब्लेडने वार करत हत्येचा प्रयत्न

• महानगरातील बागला चौक येथील घटना

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 6 नोव्हेंबर
उसनवारी पैशाच्या वादातून सर्जीकल ब्लेडने वार करून एका 28 वर्षीय युवकाचा हत्येचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात संदीप चौधरी हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी अजय उर्फ चिराअरवींद देशभ्रतार यास अटक केली. ही घटना महानगरातील बागला चौक परिसरात घडली.
बागला चौक परिसरात एक युवक रक्तबंबाळ अवस्थेत पडला असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे घटनास्थळ गाठून तात्काळ जखमीस रूग्णालयात उपचारासाठी दाखल केली. त्याची विचारपूस केली असता, पैशाच्या वादातून आरोपीने सर्जीकल ब्लेडने वार करून जखमी केल्याचे सांगितले. पोलिसांनी लागलीच दुर्गापूर परिसर गाठून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरिक्षक निलेश वाघमारे, पोलिस उपनिरिक्षक संदीप बच्छीरे, महेंद्र केसरकर, सचिन बोरकर, संतोष कनकम, भावना रामटेके यांच्या पथकाने केली.
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here