लालबागमध्ये लग्न घरात गॅस सिलेंडरचा स्फोट, नववधूच्या वडिलासह 16 जखमी

सकाळी सात वाजण्याच्या सुमारास या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. लग्नासाठी आणलेल्या सर्व वस्तू या आगीत जळाल्या. घराचीही पडझड झाली आहे. स्फोटामुळे 16 जण जखमी झाले असून त्यातील 12 जणांना केईएम हॉस्पिटल व 4 ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मुंबई प्रतिनिधी

मुंबई :- लालबाग मधील गणेश गल्लीत एका इमारतीतील घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात 16 जण गंभीर जखमी झाले. लग्न घरात हा प्रकार घडला असून त्यात नववधुचे वडिलही गंभीर जखमी झाले आहेत.

बंद घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात किमान 16 जण जखमी झाले आहेत. सिलेंडर स्फोटानंतर मोठी आग लागली होती. अग्निशामक दलाच्या 2 गाड्या व 2 टँकरनी ही आग आटोक्यात आणली आहे. गणेश गल्लीत साराभाई मेन्शन ही 4 मजली इमारत आहे. या इमारतीतील महेश राणे यांच्या मुलीचा विवाह आहे. आज हळदीचा कार्यक्रम होता. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. लग्नासाठी आणलेल्या सर्व वस्तू या आगीत जळाल्या. घराचीही पडझड झाली आहे. स्फोटामुळे 16 जण जखमी झाले असून त्यातील 12 जणांना केईएम हॉस्पिटल व 4 ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी येथे भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here