गोंदिया सौन्दड लोहिया विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न.
गोंदिया / सौन्दड:- रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (कला व विज्ञान ), सौन्दड येथे 6 डिसेंबर, 2020 ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.जगदीश लोहिया, संस्थापक- संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था, प्रमुख अतिथी मा.आ.न. घाटबांधे- संस्था उपाध्यक्ष , मा.शमिम अहमद सय्यद, मा.प्रल्हाद कोरे, मा.राजकुमार चांदेवार, मा.राजेंद्र मेश्राम सर, मा.बाबुराव हरणे, मा.गुलाब शहारे, मा.वसंता विठ्ठले, प्राचार्य मा.मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे,लोहिया कॉन्व्हेंटच्या हेडमिस्ट्रेस संयुक्ता जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांनी , ”डॉ.बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून आपले जीवन यशस्वी करा”असे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी प्राचार्य मधुसूदन अग्रवाल , हेडमिस्ट्रेस संयुक्ता जोशी,मा.राजेंद्र मेश्राम सर व मा.बाबुराव हरणे सर त्याचबरोबर विद्यालयातील शिक्षक श्री.डी.एस.टेंर्भुणे, कु.दीपा उजवणे यांनी डॉ.बाबासाहेबांच्या कार्याचा परिचय व त्यांच्या कार्याला अनुसरून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या भाषण व गीतांतून बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात कोविड-19 च्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. श्रद्धांजली गीताद्वारे या महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला संस्था व विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्यगण, पालक, विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका कु.यु.बी.डोये यांनी केले तर आभार प्राचार्य गुलाबाचंद चिखलोंढे यांनी मानले.