विद्युत शार्ट सर्कीट झाल्यामुळे आग लागुन शेतातील ऊस व ड्रिप संच जळून खाक. 16 लाख रूपयांचे नुकसान.
16 लाख रूपयांचे नुकसान, शेतकरी मानिक दांडेकर यांचे शेतात विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे सदर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सदर शेतकऱ्याने विद्युत विभागाने व शासनाने जबाबदारी स्विकारून नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी केली
युवराज मेश्राम प्रतीनिधी
नांद:- येथील प्रगतिशील व सुशिक्षित शेतकरी मानिक कान्हुजी दांडेकर यांचे शेतातील अचानक पोल तारांच्या विद्युत शार्ट सर्कीट झाल्यामुळे आग लागुन ऊस व ड्रिप संच जळून खाक झालेत.हि घटना दि. 3 रोजी दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास घडली.जिवंत पोल तारांच्या शार्ट सर्क्रीटमुळे आग लागली असता याबाबत मानिक दांडेकर यांनी फोनवरून स्थानिक लाईनमन ईश्र्वर वाकडे यांना सुचना केली असता लाईनमन वाकडे यांनी तात्काळ विद्युत पुरवठा बंद करून घेतला.तोपर्यंत ड्रिप संच व ऊस जळून खाक झाला होता. सदर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात 16 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
मानिक कान्हुजी दांडेकर यांचे शेत सुकळी (रिठी) त.सा.क्र.40 अ ,गट नं. 62 असुन 3 हेक्टर 74 आर शेत आहे. या शेतात ते 8 वर्षांपासून ऊसाचे उत्पादन घेत आहेत.ऊसाचे उत्पन्न घेण्याचे हे त्यांचे 9 वे वर्ष आहे.ऊसाचे पिक घेऊन त्या ऊस उत्पन्नातुन ते दरवर्षी आपल्या शेतातच ऊसाची प्रक्रीया करून गुळाची भेल बनवून ती मार्केटमध्ये विकतात.परंतु यावर्षी विद्युत पोल ताराच्या शार्ट सर्क्रीटमुळे 3 हेक्टर 74 आर जवळपास 9 एकर जागेतील ऊस जळून राख झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.ऊसाला बोरमधील पाणी पुरवठा कमी होत असल्याने त्यांनी ड्रिप संचाकरीता विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक ,शाखा उमरेड या बॅकेतुन 8 लाख 40 हजार रूपयांचे कर्ज घेऊन ड्रिप संच शेतात उभारला होता.परंतु विद्युत पोल तारांच्या शार्ट सर्क्रीट झाल्याने आगीमुळे 6 लाख रूपयांचे ड्रिप संच व 10 लाख रूपयाचा ऊस जळून राख झाल्याने , एकूण 16 लाख रूपयांचे रूपयाचे मानिक दांडेकर यांचे विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे सदर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर सदर शेतकऱ्याने विद्युत विभागाने व शासनाने जबाबदारी स्विकारून नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी केली.