हिंगणघाट पतीने लोखंडाच्या रॉडनी केली पत्नीची निर्घृण हत्या.
पतीने लोखंडाच्या रॉड मारून स्वताःच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना हिंगणघाट लक्ष्मी टॉकीज परीसरातील नारायण मेडिकलला जवळ दुपारच्या सुमारास घडली.
मृत श्वेता मुन्ना गुप्ता
प्रशांत जगताप प्रतिनिधी
हिंगणघाट:- पतीने लोखंडाच्या रॉड मारून स्वताःच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना हिंगणघाट पाेलीस स्टेशनच्या हदीत शिवाजी वार्ड येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली. पाेलिसांनी आराेपी पतीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे.
प्राप्त माहिती नुसार श्वेता मुन्ना गुप्ता असे मृत महिलेचे नाव असून, मुन्ना गुप्ता असे आराेपी पतीचे नाव आहे. मृत श्वेता आणी मुन्ना यांचा विवाह 12 वर्षा अगोदर झाला होता. त्यांना एक 10 वर्षाचा मुलगा आहे. आणी आताच काही दिवसा अगोदर त्यांना 1 मुलगी झाली ती आता 1 महिण्याची आहे. त्यांचा आईची बाबांनी हत्या केल्यामुळे आज 10 वर्षाचा मुलगा आणी 1 महीण्याची मुलगी आई आणी बाबा ला पोरके झाले आहे.
आराेपी मुन्ना गुप्ता
जनते द्वारा माहिती नुसर मुन्ना गुप्ता हा सनकी स्वरुपाचा होता. तो पत्नीवर शक करायचा. तो पत्नीला नेहमी मारायचा. पती पत्नी मध्ये रोज भांडण व्हायच. आज पण पती मुन्ना आणी पत्नी श्वेता तिच दुपारच्या सुमारास भांडण झाल आणी भांडण अगदी विकोपाला गेल. त्यामुळे रागाच्या भानात मुन्ना गुप्ताने आपल्या पत्नीची लोखंडाच्या रॉडनी मारून हत्या केली. त्यावेळी 10 वर्षाचा मुलगा, 1 महिण्याची चिमुकली आणी मुन्ना गुप्ताची आई घरी होती.
हिंगणघाट पाेलिसांनी आराेपी मुन्ना गुप्ताला ताब्यात घेत त्यास अटक केली. याप्रकरणी हिंगणघाट पाेलिसांनी भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक करीत आहेत.