*बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात*……

47

*बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात*……

मुंबई : मुंबई महापालिकेच्या दादर येथील सिल्ट यार्डमध्ये मलजलाची विल्हेवाट लावण्याचे काम पदरात पाडून घेण्यासाठी अनुभवाबाबतची बनावट कागदपत्रे सादर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून हे काम मिळविण्यासाठी आपल्या नावाची खोटी कागदपत्रे पालिकेला सादर केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय संबंधित कंपनीने घेतला आहे.
केवळ कंत्राटदारच नव्हे तर कागदपत्रांची शहानिशा न करणारे अधिकारीही दोषी असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुंबईच्या शहर भागात सुमारे ५०० किलोमीटरच्या वाहिन्या आणि मुख्य मलवाहिन्यांचे जाळे पसरले आहे.
या वाहिन्यांमध्ये साचणारा गाळ वेळोवेळी काढणे गरजेचे असते.
त्यामुळे मलवाहिन्या तुंबण्याचे प्रकार टाळता येतात.
या वाहिन्यांमधून काढलेला गाळ दादर शिल्ट यार्डमध्ये नेण्यात येतो आणि तिथे त्यावर प्रक्रिया करण्यात येते.
मलजलावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने दादर यार्डमध्ये २०१७-१८ मध्ये मल सुकविण्याची यंत्रणा उभारली.
ही यंत्रणा चालविण्यासाठी कंत्राटदाराला दिलेल्या कंत्राटदाराची मुदत संपुष्टात आल्यामुळे नव्या कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या.
निविदा प्रक्रियेत अनुभवाबाबतची आवश्यक ती प्रमाणपत्रे सादर न केल्यामुळे तीनपैकी एक कंत्राटदार अपात्र ठरला होता.
या कंत्राटदाराने या संदर्भात अपील करीत प्रमाणपत्र सादर करण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली होती.
अधिकाऱ्यांनी ती मान्य केली.