वाढत्या वीजबीला विरोधात काटोल मध्ये 7 डिसेंबरला विदर्भवादी करणार ठिय्या आंदोलन.

51

वाढत्या वीजबीला विरोधात काटोल मध्ये 7 डिसेंबरला विदर्भवादी करणार ठिय्या आंदोलन.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 7 डिसेंबरला आंदोलन होणार आहे.  काटोल मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे. या आंदोलनामध्ये जनतेने सहभागी होऊन आपले हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर यावे व या आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन सुनील वडस्कर यांनी केले आहे.

युवराज मेश्राम प्रतीनिधी
काटोल :- कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांचे उद्योग धंदे बंद होते. व्यावसायिकांचे व्यवसाय बंद होते. त्यामुळे कोरोना काळातील विज बिल सरकारने भरावे व जनतेवर लादलेला भुर्दंडतून सर्वसामान्य जनतेला मुक्त करावे या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती येत्या ७ डिसेंबरला शनि चौक प्रवेशद्वाराजवळ सरकारचे लक्ष वेधन्यासाठी ठिय्या आंदोलन करणार आहे अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कोर कमिटी सदस्य सुनील वडस्कर यांनी दिली आहे.

जनतेचे विज बिल कमी करावे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने या आधीसुद्धा गावागावात वीजबिलाची होळी तसेच सरकारला निवेदन अशा प्रकारचे अनेक आंदोलन केले होते तरीसुद्धा सरकारने जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची दखल घेतली नाही, तर उलट ऊर्जामंत्री राऊत यांनी वीज ग्राहकांचे वीज बिल कमी करणार नाही असे जाहीर वक्तव्य केले, त्यासाठी विदर्भवाद्यांनी निषेध केला आहे.आता सर्वसामान्यांची वीज तोडण्याच्या अगोदर मुंबई पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील उद्योगपती, सरकारी बंगले, मंत्रालय यांची वीज थकबाकी जाहीर करावी त्यांच्याकडून वीज बिल वसूल करावे त्यानंतरच ऊर्जामंत्री राऊत यांनी विदर्भातील सामान्य माणसांची वीज कापावी. विदर्भ राज्य समिती आता विजेची आरपारची लढाई लढणार आहे असे सुनील वडवाडस्कर यांनी सांगितले आहे.

विदर्भातील जनतेचे वीजबिल संपवा, 200 युनिटपर्यंत वीज बिल मुक्त करावे, त्यानंतरचे विज बिल निम्मे करावे, तसेच कृषीपंपाचे वीज बिल मुक्त करावे अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विदर्भातील शेतकर्‍यांचे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भातील केवळ 7 कोटी आणि उर्वरित महाराष्ट्राला 9913 कोटी पॅकेज दिले. हा विदर्भावर अन्याय आहे. म्हणून संपूर्ण विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 7 डिसेंबरला आंदोलन होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून काटोल मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे. या आंदोलनामध्ये जनतेने सहभागी होऊन आपले हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर यावे व या आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन सुनील वडस्कर यांनी केले आहे.