*मारझोड करून डोके फोडणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करा : फिर्यादीची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी

✒अरूण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731
नागभीड : नागभीड नगरातील प्रभाग-७ मधील दोन रहिवाशी कुटुंबातील भांडण मारहाणी पर्यंत पोहोचले. यात प्रभुदास कारुजी खापर्डे यांना डोक्यावर काठीने मारल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडले त्यांच्या डोक्यावरील जखमेवर आठ टक्के पडले . याप्रकरणी सौ सुकेशनी राहुल खापर्डे वय 36 वर्ष यांनी नागभीड पोलिस स्टेशन येथे तोंडी रिपोर्ट दिली आहे. ही घटना दिनांक २६/११/२०२१ रोजीची आहे. मात्र दोषिवर कारवाई बाबत दिरंगाई होत असल्याचा ठपका ठेवून आज दिनांक 5/ 12/2019 रोजी पत्रकार परिषदेत सुकेशनी राहुल खापर्डे यांनी सदर मारहाण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. घटना याप्रमाणे आहे की दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी सुकेशनी खापर्डेचा मुलगा क्रीश राहुल खापर्डे यांने म्यागीचे पाऊच घराशेजारी फेकले या कारणावरून शेजारी दीपा खापर्डे व वृषभ खापर्डे यांनी क्रीशला जिवे मारण्याची धमकी दिली असता घाबरून व टेन्शन घेऊन क्रीशची तब्येत बिघडली. त्याला दवाखान्यात नेण्यात आले व उपचार घेतला या कारणावरून रात्री आठ वाजताच्या सुमारास सुकेशनी खापर्डे यांनी दीपा खापर्डे हिला हटकले असता दीपा खापर्डे व तिचा मुलगा वृषभ खापर्डे आणि नरेंद्र खापर्डे यांनी भांडण करून सुकेशनी खापर्डेला मारहाण केली तेव्हा भांडण सोडविण्यासाठी आलेले सुकेशिनीचे सासरे प्रभूदास कारुजी खापर्डे यांनासुद्धा लाथा-बुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण केली. यात प्रभुदास खापर्डे यांच्या डोक्यावर काठीने घाव घातल्याने ते रक्तबंबाळ होऊन खाली पडले. लागलीच पोलीस स्टेशन गाठून तोंडी रिपोर्ट दाखल केली असता पोलिसांनी जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर दुखापत असल्याने त्यांना चंद्रपूर सामान्य रुग्णालयात आणि नागपूर मेडिकल कॉलेजला हलविण्यात आले व उपचार घेतला. अशा गंभीर प्रकरणी दोषींवर अजूनही काहीही कार्यवाही झाली नसल्याने पोलिस स्टेशन नागभीडकडून दिरंगाई न करता तात्काळ कार्यवाही करून दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी फिर्यादी सुकेशनी खापर्डे व त्यांचे कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
[ प्रतिक्रिया : पोलीस स्टेशनकडून चौकशी /तपास करून दोषींवर कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंद केलाइ आहे.
– ठाणेदार प्रमोद मडामे ]