एमडीएन फ्युचर स्कूलचे स्पर्धेत यश*

55

*एमडीएन फ्युचर स्कूलचे स्पर्धेत यश*

एमडीएन फ्युचर स्कूलचे स्पर्धेत यश*
एमडीएन फ्युचर स्कूलचे स्पर्धेत यश*

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
7620512045

लाखणी :-अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील जिल्हास्तरीय राज्य टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये लाखनी येथील एमडीएन फ्युचर स्कूलच्या १७ वर्षांखालील मुली आणि मुलाच्या संघाने राज्य टेनिस बॉल स्पर्धेत यश मिळवले आहे. दोन्ही संघांनी विजेतेपद घेऊन क्रमश: २२ आणि ३ रे स्थान पटकावले. यात शालेय क्रिकेट प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षक तीर्थनाथ गाढवे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूंचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक गिऱ्हेपुजे, संचालक डॉ. रंजू पाल गिऱ्हेपुजे, | प्राचार्या शुभदा जोशी व्यास यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले. खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरव केला. विजेत्या संघाचे सदस्य १७ वर्षाखालील मुलींमध्ये संघाची कर्णधार श्रावणी वहाणे, उपकर्णधार अस्वती वासनिक, राधिका बावनकुळे, मानसी गिऱ्हेपुजे, यशिता फुडे, | श्रावणी चोले, धनश्री बडवाईक, मुस्कान पटले, मानसी खंडाईत, डोल्बी शेंडे, | मोनाली भोंडे, राशी भास्कर, सायली राठोड तर १७ वर्षांखालील मुलांचा संघामध्ये कर्णधार सिद्धेश वंजारी, उपकर्णधार शौर्य निखाडे, विवेक शेंडे, रौनक वाघाये, हर्षल बडवाईक, नयन सहारे, छगन बडवाईक, हर्ष झलके, ओम माने, विश्वेश गभणे, लक्ष गिर्हेपुजे, प्रज्युत खेडीकर, सिद्धेश वंजारी, अर्णव गायधणे, स्वामी बिसेन, वंश फंदे, शारांश खेडीकर, तन्मय गिऱ्हेपुजे यांचा समावेश आहे. राज्य टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिपमधील यशामुळे खेळाडूंचे कौतुक होत आहे.