लाखनी तालुक्यात पक्षीय गटबाजीमुळे बंडखोरीची चिन्हे

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
7620512045
लाखणी:-लाखनी तालुक्यात सहा जिल्हा परिषद क्षेत्र व १२ पंचायत समितीच्या निवडणुका २१ डिसेंबरला पार पडणार आहे. ६ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करावयाची आहेत. तालुक्यातील पक्षीय उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. उमेदवारांना फॉर्मची प्रतीक्षा आहे. पक्षाची तिकीट कुणाला प्राप्त होते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे.तालुक्यातील लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्र नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. मुरमाडी ( तुपकर) जिल्हा परिषद क्षेत्र नामाप्र गटासाठी आहे. मिनी मंत्रालयात जाण्यासाठी अनेक उमेदवार या दोन महिला आरक्षित क्षेत्रासाठी पतींनी पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावला आहे.
शनिवारी १० उमेदवारांनी अर्ज केले दाखल
नामनिर्देशनपत्र भरण्याची तारीख जवळ आल्याने उमेदवारांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. पहिल्या दोन दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. पक्षाच्या बैठकी सुरु आहेत. उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. तालुक्यात ऐन वेळेवर पक्षबदल होऊ शकतो. लाखनी तालुक्याचे जिल्हा परिषद व पंचायत समिती नामनिर्देशनपत्र पंचायत समितीचे कार्यालयात स्वीकारले जात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी भंडाऱ्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी व सहायक निवडणूक अधिकारी लाखनीचे तहसीलदार महेश सिताळे निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.क्षेत्रांत स्थलांतरण करण्याची शक्यता आहे. महिला आरक्षित क्षेत्रासाठी पतींनी पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावला आहे.