मिंडाळा येथील सरपंचाच्या गैरकारभाराची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करावेः पञकार परिषदेतुन मागणी

55

मिंडाळा येथील सरपंचाच्या गैरकारभाराची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करावेः पञकार परिषदेतुन मागणी

मिंडाळा येथील सरपंचाच्या गैरकारभाराची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करावेः पञकार परिषदेतुन मागणी
मिंडाळा येथील सरपंचाच्या गैरकारभाराची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करावेः पञकार परिषदेतुन मागणी

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीडः नागभीड तालुक्यातील मिंडाळा ग्रामपंचायतचे सरपंच गणेश गड्डमवार यांच्या गैरकारभाराची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच सरपंचाचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी पञकार परिषदेतुन करण्यात आली आहे. मिंडाळा येथील सरपंचाने ग्रामपंचायतच्या नाली बांधकामा मध्ये ‘ नाट फार रिसेल ‘ असा ठप्पि असलेला सिमेंट वापरण्यात आला. हा सिंमेट कोणी दिला ? कुठुन आला ? याची चौकशी करुन कारवाही झाली पाहीजे. या बाबत प.सं.चे बांधकाम अभियंता लाडे यांना कळविन्यात आले. माञ त्यांनी थातुरमातुर चौकशी केली.आणी काम बंद केले. सीमेंट बद्दल ग्रा.प.चे चपराशी यांना वीचारले तर चपराशी यांनी मला माहीत नाही असे उत्तर दिले. याबाबत ग्रा.प.च्या सचिव यांनाही विचारण्यात आले तेव्हा त्यांनीही उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे सरपंच, सचिव व ईतर यांचे गैरव्यवाहारात संगनमत असावा असाही आरोप करण्यात आला. या गैर व्यवहाराबाबत जिल्हाधिकरी, मुख्यधीकारी यांनाही चौकशी संबंधित पञव्यवहार करण्यात आला आहे. मिंडाळा येथील सरपंच यांच्या पत्नी ह्या नागभीड प.सं.च्या सभापती होत्या आणी आता पं.सं. सदस्या आहेत.त्यामुळे पाणी कुठेतरी मुरत असावा असे आम्हाला वाटत आहे असेही पञकार परिषदेत कथन केले. एवढेच नाही तर सरपंच व त्यांच्या साथीदारांनी ग्रामपंचायतला व कुठल्याही अधिकाऱ्यांला माहीती न देता व कायदेशीर बाबीचे पालन न करता अधिकाराचा गैरवापर करत स्मशानभुमी येथील निलगीरी व सागाचे अंदाचे १५० झाडे कापुन परस्पर विकले. तसेच जि.प.प्राथमीक शाळेचे निर्लीखीत न करता शाळेची ईमारत पाडण्यात आली. याच ईमारतीतील लाकुडफाटा,खिडक्या,कवेलु याची बेकायदेशीर विल्हेवाट लावली. या बाबातचे पंसं.नागभीड यांना १३/१०/२०२१ ला तक्रार देण्यात आली. माञ साधी चौकशी झाली नाही. त्यामुळे पञकार परीषदेच्या माध्यमातून सरपंचाच्या गैरव्यवहाराची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच सरपंचाचे निलबंन करण्यात यावे अशी पञकार परिषदेतुन ग्रा.प. सदस्य विनोद हजारे, वालिस लाउञे यांनी मागणी केली आहे.