कुऱ्हाड येथे आरोग्य केंद्र परिसरात, गावठाण एरियात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू कोणाच्या आशीर्वादाने

52

ईसा तडवी
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्र भर अवैध धंदे, दारू, सट्टा, पत्ता बंद ठेवण्याचे आदेश असतांनाही कुऱ्हाड मध्ये गावठाण एरियात आरोग्य केंद्राच्या बाजूलाच 50 मीटर अंतर्गत सट्टा – जुगार – दारू विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

शाळा-धार्मीकस्थळे-आरोग्यकेंद्र अशा कोणत्याही स्थळाच्या आवारात कोणताही अवैध धंदा करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाते.

परंतु याविषयी वारंवार तक्रारी देऊनसुद्धा ह्या अवैध धंदे करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये शंकेचा डोंगर उभा आहे. आताच काही वेळापूर्वी गावात सट्टा घेणाऱ्या व खेळणाऱ्या 4 वेक्तींना पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु काही कारणास्तव त्यांना लगेच सोडन्यात आले.

अशाच प्रकारे या अवैध धंदे करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने या अवैध धंदे करणाऱ्यांची मजल वाढताना दिसून येत आहे.