ग्रामपंचायत फुकटा येथे महामानवाला अभिवादन..

49

ग्रामपंचायत फुकटा येथे महामानवाला अभिवादन..

ग्रामपंचायत फुकटा येथे महामानवाला अभिवादन..
ग्रामपंचायत फुकटा येथे महामानवाला अभिवादन..

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

दि 06/12/2021 वार्ताहर वडणेर। हिंगणघाट तालुक्यातील फुकटा येथे ६ डिसेंबर रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. दरवर्षी हा कार्यक्रम पार पाडला जातो, नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार च्या , ग्रामपंचायत फुकटा संयुक्त च्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुकटा येथे कार्यक्रमाचे आयोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचण्याचे काम केले जात असते, नेहरू युवा केंद्र वर्धा वतीने वतीने रॅली न काढता व कोविड -19 नियमाचे पालन करून ग्रामपंचायत फुकटा येथील डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिशरन-पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी नेहरू युवा केंद्राचे तालुका माझी स्वयंसेवक सचिन महाजन .यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन करून, व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली , सरपंच नंदाताई योगेस्वर उमाटे , यांनी फोटो चे पूजन करून कार्यक्रम पार पाडला, ग्रामपंचायत सदस्य मोरेस्वर शेंडे ,प्रदीप वनकर, माझी ग्रामपंचायत सदस्य ,अरविंद कुडमते, रमेश वरघणे, सूरज ढगे, निलेश हारगोडे, ग्रामपंचायत शिपाई ,अरविद हारगोडे, स्वप्नील वानखडे, संगणक परिचालक प्रवीण हटवार , नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयेंसेवक हिंगणघाट चे सचिन सोगे, व गावातील आदि उपस्थित राहून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.