माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची जिल्हा माहिती कार्यालयाला भेट

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची जिल्हा माहिती कार्यालयाला भेट
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016
बुलडाणा, : – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयास सदीच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कार्याबाबत विचारणा करीत माहिती घेतली. त्याचप्रमाणे जिल्ह्याची भौगोलिक, सांस्कृतिक, साहित्यीक, कृषि, प्रशासकीय संपूर्ण माहिती घेतली. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती सहाय्यक निलेश तायडे यांनी महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. भेटीप्रसंगी कार्यालयाची पाहणी करीत कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. यावेळी महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांचे विभागीय संपर्क अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला येथील प्रकल्प अधिकारी श्री. हिवाळे, कार्यालयाचे कर्मचारी दुरमूद्रक चालक श्रीमती श्रेया दाभाडकर, प्रेमनाथ जाधव, शिपाई राम पाटील, वाहनचालक प्रमोद राठोड आदी उपस्थित होते.