लोकशाही दिनात 137 तक्रारी प्राप्त
लोकशाही दिनात 137 तक्रारी प्राप्त

लोकशाही दिनात 137 तक्रारी प्राप्त

लोकशाही दिनात 137 तक्रारी प्राप्त
लोकशाही दिनात 137 तक्रारी प्राप्त

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

यवतमाळ : – जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज एकूण 137 तक्रारी प्राप्त झाल्या. लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी तसेच यापुर्वीच्या सर्व प्रलंबित तक्रारी पुढील 10 दिवसात निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले.
प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी जिल्हा समन्वय समितीचा आढवा घेतला. अनुकंपा पदभरती, बिंदू नामावली, जात पडताळणी, विहित वेळेत अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती, सुंदर माझे कार्यालय अंतर्गत अभिलेख व्यवस्थापन, झीरो पेन्डसी आदि बाबींच्या नस्ती अद्यावत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी विविध विभाग प्रमुख व अधिकारी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here