माथेरानसाठी इतिहासातील महत्वाचा निर्णय, पर्यटकांना घोड्या सोबत ई रिक्षाचा घेता येणार आनंद

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-जगतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असणाऱ्या माथेरान येथे पर्यटकांना आता घोड्या सोबोत ई रिक्षाचा देखील आनंद घेता येणार आहे.खऱ्या अर्थाने म्हणायचे झाले तर हा ऐतिहासिक निर्णय असून स्वंतंत्राच्या काळानंतर प्रथमच पर्यावरण संवेदनशील माथेरान मध्ये ई रिक्षाला ही परवानगी मिळाली.        

माथेरान येथे इको सेन्सेटिव्ह झोन असल्याने केवळ रुग्णवाहिका अग्निशमन वाहनाशिवाय कुठल्याच वाहनाला माथेरान मध्ये प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे काही अडचणींचा सामना येथील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना देखील करावा लागत होता.

तर एकीकडे इंग्रजांच्या काळातील माणसालाच माणूस ओढत चालणारी हात रिक्षाची ही अमानवी प्रथा कुठे तरी थांबली गेली पहिजे यासाठी लढा येथील सुनील शिंदे यांनी न्यायालयात लढला आणि या लढ्याला तब्बल १२ वर्षा नंतर यश देखील मिळाले आहे.न्यायालयीन परवानगी मिळाल्यानंतर आज या ई रिक्षाला स्थानिक प्रशासनाकडून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले.

 तर आज प्रथम पायलट प्रोजेक्ट् म्हणून तीन महिने ही ई रिक्षा शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, पर्यटक यांच्या सेवेत दाखल झाली असून, त्याचे उदघाटन माथेरान प्रवेश द्वार दस्तुरी येथे मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे व RTO चे अधिकारी, तसेच माथेरान येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्षा यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.प्रशासनाच्या सर्व मंजुरी याठिकाणी मिळाल्याने हिरवा झेंडा फडकवून या ई रिक्षाचे स्वागत येथील मान्यवरांनी व ग्रामस्थांनी केले,

आज येथील शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांनी ई रिक्षा मध्ये बसण्याचा आनंद देखील घेतला.

बाईट-सुनील शिंदे,श्रमिक रिक्षा संघटना ई रिक्षा बाबत प्रशासक सुरेखा भणगे शिंदें यांनी देखील यावेळी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here