शिक्षणक्षे़त्राच्या अस्तित्वासाठी वि.मा.शि.संघाचा उमेदवार विजयी होणे काळाची गरज- माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर ,6 डिसेंबर: शिक्षण क्षे़त्रात अनागोंदी कारभार माजला आहे. दर दहा दिवसांनी सरकार नवनवे फतवे काढून शिक्षकांना पर्यायाने शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्राला अडचणीत आणत आहे. मागील बारा विधान परिषदेच्या सभागृहात प्रश्न मांडून ते सोडवून न घेतल्यामूळे शिक्षकांसमोर नोकरी कशी टिकवावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर विभागातून निवडून गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संबधित शाखेच्या विद्यमान आमदारांनी सभागृहात किती प्रश्नांची सोडवणूक केली ते विचारून पहा. पक्षाच्या आदेशापलीकडे ते जावू शकत नाही. आणि म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले निवडून येणे हे शिक्षकांच्या भवितव्यासाठी फार महत्वाचे आहे ’नव्हे ती काळाची हाक आहे’ हे समजून घेत विमाशि संघावर प्रेम करणारे कार्यकर्ते,पदाधिकारी,सहकार्य आणि पाठींबा देणाऱ्या शिक्षकांच्या, प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, एम.सी.व्ही.सी., आयटीआय, जुनी पेन्शन आश्रमशाळा शिक्षकांच्या संघटनांनी पुर्ण ताकदीने या निवडणूकीत अडबाले सरांना पुर्ण तण,मन,धनानी शक्ती लावून निवडून आणावे. कधी नव्हे असा सुवर्णयोग या वेळेस जूळून आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात अडबाले सरांचे भव्य स्वागत करून त्या त्या जिल्हयातील सर्व संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या झाल्या आहेत हे त्यांच्या झंझावाती प्रचारात दिसून येत आहे आणि म्हणून नियोजनबध्दपणे, सावधपावले टाकत आपण विजयाकडे वाटचाल केली पाहिजे, आपला विजय निश्चित आहे ही खात्री बाळगा. या निवडणूकीत जातीपातीचे कोणतेही राजकारण येणार नाही ही काळजी घ्या. मी स्वतः नागपूर आणि गोंदिया जिल्हयावर लक्ष केंद्रित करून आहे. तेव्हा आपणही पूर्ण ताकदीने कामाला लागा अशी सुचना त्यांनी या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या सहविचार सभेप्रसंगी केली.

विचारपिठावार महामंडळ सहकार्यवाह जगदीश जुनगरी, विमाशि संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले, विजूक्टाचे माजी अध्यक्ष प्रा.दादा दहिकर, माजी बोेर्डमेंबर तथा जिल्हाध्यक्ष मारोतराव अतकरे,जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे उपस्थित होते. यावेळी बोलतांना डायगव्हाणे म्हणाले की कान्हेन्ट शिक्षकांचा प्रश्न सरकारने मागील तीन वर्षापासून 25 टक्के प्रवेशीत आदिवासी मुलांची फी संस्थेला जमा न केल्यामूळे कान्हेन्ट स्कूल अडचणीत आल्या आहे. नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त, परंतू 100 टक्के अनुदान 2005 नंतर आलेल्या शिक्षक,प्राध्यापकांच्या जूनी पेन्शन प्रश्न नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्याना जूनी पेन्शन जशीच्या तशी लागू करणे. विनाअनुदानित शाळांना पंधरा ते विस वर्ष उलटूनही अनुदानाचे टप्पे पूर्ण न करणे आश्रमशाळा शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न, वरिष्ठ व निवडश्रेणीचा प्रश्न हे असे अनेक प्रश्न सभागृहात अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडून ते सोडवून न घेतल्यामूळे निर्माण झाले आहे. विद्यमान शिक्षक आमदार पक्ष आदेशाच्या पलीकडे जावून सरकारशी संघर्ष करू शकत नाही आणि म्हणून शीक्षण क्षेत्रात अनागोंदी कारभार निर्माण झाला आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे भिष्म पितामह ना.बा.सपाटे यांनी 1973 मध्ये केलेल्या राज्यव्यापी संपामूळे शिक्षकांचे पगार संस्थेमार्फत न होता बँकेतून व्हायला सुरूवात झाली 1978 च्या 68 दिवसाच्या संपात मी स्वतः 15 दिवस जेलमध्ये होतो त्या संपामूळे केंद्राप्रमाणे जशाच्या तसा महागाई भत्ता राज्य सरकारला लागू करावा लागला.1995 च्या परीक्षा बहिष्कार आंदोलनामूळे शिक्षकांना केद्रांप्रमाणे पाचवा वेतन आयोग जशाचा तसा लागू झाला ही विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची देण आहे. मी आणि बी.टी.भाऊ विधानपरीषदेमध्ये असे पर्यंत शिक्षकांवर अन्याय करण्याची हिंमत सरकार मध्ये नव्हती ही वस्तुस्थिती आहे. आज नोंदणी झालेल्या मतदारापैकी 90 टक्के मतदार नोंदणी विमाशी संघाचे धडाडीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यानी करून अर्धा विजय खेचून आणला आहे. ही गती अशीच कायम राहू द्यावी.

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना विमाशीचे उमेदवार सुधाकर अडबाले म्हणाले की वरीष्ठ निवडश्रेणी ही ज्या तारखेला सेवेची 12 व 24 वर्ष पुर्ण होतात त्या तारखेपासूनच लागू करावी यासाठी वर्धा शिक्षणाधि कार्यांना रात्रो दहा पर्यंत घेराव आंदोलन करून डायरेक्टर कडून लेखी आदेश घेण्याच्या अटीवर मागे घेण्यात आला व सर्व जिल्हयातील शिक्षणाधिकारी तसा आदेश द्यायला तयार आहे. सत्तेत नसतांना सुध्दा विमाशी संघ शिक्षकांचे अनेक प्रश्न रस्त्यावर उतरून संघर्ष करून सोडवून घेत आहे. आणि म्हणूनच नागपूर, गोंदिया, जिल्हयातील प्रचारात शिक्षकांचा उस्फुर्त असा पाठींबा मिळत आहे. याप्रसंगी सुधाकरराव अडबाले संस्थापक अध्यक्ष असलेल्या व सहा जिल्हयात 14 शाखेसह 6178 सदस्य संख्या असलेलया विदर्भातील दुसऱ्यात क्रमांकाच्या नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या नाविन्यपूर्ण दिनदर्शिकेचे संपादन प्रभाकर पारखी यांनी केले आहे. याप्रसंगी महामंडळ सहकार्यवाह जगदीश जुनगरी,प्रा.दादा दहीकर,जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेडे,यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे यांनी, संचालन सतिश अवताडे, तर आभार प्रदर्शन सुरेंद्र अडबाले यांनी केले. या सहविचार सभेला जिल्हाभरातून जिल्हापदाधिकारी, तालुका, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका कान्हेन्ट, आय.टी.आय, एम.सी.व्हीं सी, आश्रमशाळा शिक्षकांची मोठ्या संख्येनी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here