धक्कादायक बातमी! न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच तरुणीने घेतला गळफास, तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

ब्रम्हपुरी,6 डिसेंबर :ब्रम्हपुरी येथील नवीन न्यायालयाच्या प्रवेश द्वारावर एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. आज, मंगळवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की घातपात? याबाबत विविध तर्क – वितर्क लावले जात आहे. पौर्णिमा मिलिंद लाडे (२७), असे मृत तरुणीचे नाव आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी ब्रम्हपुरी येथे आली होती. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ती तालुका न्यायालय इमारतीच्या लोखंडी प्रवेश द्वारावर गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. तिने आत्महत्या कोणत्या कारणाने केली याची माहिती मिळू शकली नाही.

या प्रकरणाची दखल ब्रम्हपुरी पोलिसांनी घेतली आहे. ही आत्महत्या की घातपात याचाही शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here