शपथविधी होताच आतिषबाजी करत चंद्रपुरात जल्लोष
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 5 डिसेंबर
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसर्यांदा शपथ घेतली. त्याचे थेट प्रक्षेपण गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर करण्यात आले. भाजपा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, लाडू वाटप करत जल्लोष साजरा केला.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेता खुशाल बोंडे, विजय राऊत, प्रमोद कडू, संजय कंचर्लावार, भाजपचे माजी महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे आदींची यावेळी उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील आजाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडला. राज्यपाल सि. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. भव्य अशा या शपथविधी कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी भाजपा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथील महानगरपालिकेच्या पटांगणावर जय्यत तयारी करण्यात आली होती.
शपथविधी कार्यक्रम सुरू होताच भाजपा कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. तसेच लाडू वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्यास भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
==