तलावात पडून बालिकेचा मृत्यू, चिमूर तालुक्यातील घटना

74
तलावात पडून बालिकेचा मृत्यू, चिमूर तालुक्यातील घटना

तलावात पडून बालिकेचा मृत्यू, चिमूर तालुक्यातील घटना

तलावात पडून बालिकेचा मृत्यू, चिमूर तालुक्यातील घटना

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 5 डिसेंबर
चिमूर नगर परिषद अंतर्गत येणार्‍या कवडसी (रोडी) येथील बालिका गावाजवळील तलावाजवळ खेळत असताना पाण्यात पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. दिव्यांका श्रीकांत मेश्राम (3) असे मृतक बालिकेचे नाव आहे. काही नागरिक तिथे आले असता त्यांना दिव्यांका तरंगताना दिसली. बालिकेला लगेच उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. श्रीकांत व मोना मेश्राम यांची दिव्यांका ही एकुलती मुलगी असल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चिमूर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.