एड्स जनजागृतीसाठी अलिबागमध्ये बाईक रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद…

49

एड्स जनजागृतीसाठी अलिबागमध्ये बाईक रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

अँड.रत्नाकर पाटील

रायगड ब्युरो चीफ

मो: ९४२०३२५९९३

अलिबाग:- जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा  कार्यक्रमाचे औचित्य साधून युवकांच्यामध्ये एच.आय.व्ही.एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून अलिबाग येथे बाईक रॅली काढण्यात आली. अलिबाग समुद्रकिनारा येथून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बाईक रॅली मार्गस्थ करण्यात आली.

यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. किरण शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रवीण कंदाडे, एचओडी पीसीएम नाझिया, एचओडी एसएमटी  डॉ. साक्षी पाटील, दालसा मुख्य अँड. सी.सी. कामथे, अध्यक्ष, निहा घरत, लायन्स क्लब श्रीबाग सेन्टिनिअल, अँड .निहा राऊत, फॉऊंडर मेंबर, अँड. अंकित बंगेरा, वनगे, सदस्य लायन्स क्लब हे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग  यांच्यामार्फत  सदर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी संजय माने, तपस्विनी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग आदि मान्यवर उपस्थित होते.

या वेळी  महेश गोसावी , मंगेश पाटील,  श्रीम. प्रिया निवाते व  श्रीम. आरती राजपूत, श्रीम. अर्चना जाधव, सौ. सुजाता तुळपुळे, सौ. अश्विनी कदम याना सन्मानित करण्यात आले.तर उत्कृष्ट कामगिरी केलेबाबत गणेश सुतार,अतिश नाईक, रुपेश पाटील, तसेच प्रोत्साहनपर कामगिरी केलेल्या लोकपरिषद, पनवेल, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट, पेण, आधार ट्रस्ट पनवेल या एनजीओ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर इंडेक्स टेस्टिंग मध्ये उत्तम काम केलेबाबत रिलायन्स हॉस्पिटल लोधिवली यांस  प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रभात फेरीत  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, नर्सिंग स्कूलच्या विद्याथी विद्यार्थिनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे  स्वागत संजय माने , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. रश्मी सुंकले, यांनी केले.