भिवंडी मनपामध्ये 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन..

56

मा.उपायुक्त विक्रम दराडे व माजी नगरसेवक विकास निकम यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

अभिजीत आर. सकपाळ

ठाणे ब्युरो चीफ

मो: 9960096076

ठाणे: भिवंडी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या दि. 02 डिसेंबर 2025 च्या निर्देशानुसार आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर (भा.प्र.से.) यांच्या आदेशानुसार आज महानगरपालिका मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. महानगरपालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर मा.उपायुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मनपा मुख्यालयातील पूर्णाकृती पुतळ्यास मा.उपायुक्त विक्रम दराडे व माजी नगरसेवक विकास निकम यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच जुनी मनपा इमारत परिसरातील अर्धपुतळ्यास मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी मा.उपायुक्त (कर) बाळकृष्ण क्षिरसागर, सहायक आयुक्त (निवडणूक) अजीत महाडीक, प्रभाग अधिकारी श्री. मकसूम शेख (प्रभाग समिती क्र.1), श्री. गिरीष घोष्टेकर (प्रभाग समिती क्र.4), आरोग्य विभाग प्रमुख फैसल तातली, उप-अभियंता (विद्युत) ज्ञानेश्वर वाघमारे, माहिती व जनसंपर्क अधिकारी, श्रीकांत परदेशी, परवाना विभाग प्रमुख स्नेहल पुण्यार्थी, शहर विकास विभाग प्रमुख समीर जवरे, वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालयीन अधीक्षक नितेश चौधरी, वाहन विभाग प्रमुख शेखर चौधरी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत सोनावणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती, निवृत्त शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.