दूधबर्डी येथे कृषी व पशु खाद्य व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण संपन्न.

दूधबर्डी येथे कृषी व पशु खाद्य व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण संपन्न.

दूधबर्डी येथे कृषी व पशु खाद्य व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण संपन्न.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442

नागपुर:- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी आणि विस्तार शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नागपुर पुरस्कृत ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण या योजने अंतर्गत “पशु खाद्य व्यवस्थापन” या विषयावर २३ ते २९ डिसेंबर या कालावधीत सात दिवसीय प्रशिक्षणचे आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणासाठी नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील १६ प्रगतशील शेतकरी सहभागी झाले. या कार्यक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर चे संचालक डॉ. श्री. अनिल भिकाने अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाचे प्रकल्प उपसंचालक श्री. प्रभाकर शिवणकर आणि कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डीचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सारीपुत लांडगे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. पशु खाद्य व्यवस्थापन या विषयावर बोलतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. अनिल भिकाने, म्हणाले की, ग्रामीण शेतकरी युवकांना पशु खाद्य निर्मितीतून रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते तसेच हिरवा चारा पशुंच्या आरोग्यासाठी, दूध उत्पादनासाठी वरदान आहे. तर श्री. प्रभाकर शिवणकर यांनी शेतकऱ्यांना शेती आधारित जोडव्यवसाय करावे आणि आत्मनिर्भर व्हावे असा संदेश दिला. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. सारिपुत लांडगे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी हे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांच्यापर्यंत नव नवीन तंत्रज्ञान पोहचवण्यासाठी सतत कार्यरत असून त्याकरिता शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहावे असे प्रतिपादन केले.

सदर सात दिवसीय प्रशिक्षणामध्ये कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डीचे डॉ. अमोल हरणे (विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण) यांनी चारा पिकाचे खत व्यवस्थापन, चारा पिकांचे रोग व्यवस्थापन तर डॉ. अश्विनी गायधनी (विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या) यांनी चारा पीक लागवड तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. नागपुर पशुवैद्यकिय महाविद्यालय, नागपुर येथील प्राध्यापक डॉ. ए. पी. ढोक यांनी खाद्य कांडी बनवणे, डॉ. जी.पी. शेंडे यांनी रेशन बॅलेन्सिंग प्रोग्राम, डॉ. महेश जावळे यांनी संक्रमणाच्या काळात दुधाळ जनावरांचे आहार व्यवस्थापन आणि डॉ. मयुरा गोळे यांनी कुक्कुट खाद्य व्यवस्थापन या विषयावर विस्तृत प्रशिक्षण देण्यात आले. श्री. तुषार मेश्राम (प्रशिक्षण समन्वयक) यांनी मुरघास बनवणे, ओझोला लागवड तंत्रज्ञान, निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया या विषयांवर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकपर मार्गदर्शन व अरोली आणि ॲग्रोव्हिजन भेटीचे आयोजन केले. निरोप समारंभात सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले व त्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डीच्या कु. मयुरी ठोंबरे, विषय विशेषज्ञ (गृह विज्ञान) यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here