येरला येथिल जिल्हा परिषद शाळेत गणित/विज्ञान शिक्षकाची नेमणूक करण्याची शाळा व्यवस्थापन समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी,.
प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट : – आज बुधवार 5 जानेवारीला हिंगणघाट तालुक्यातील येरला येथिल जिल्हा परिषद शाळेत गणित/विज्ञान शिक्षकाची नेमणूक करण्याच्या मागणीचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने हिंगणघाट येथिल गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की येरला येथील जि.प उच्च प्राथमिक शाळेत ६ ते ७ वर्गा करीता विज्ञान/गणित शिक्षण चालू सत्रापासून जागा रिक्त असून विद्याथांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत.तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता शिक्षकाची लवकरात लवकर नियुक्त करण्यात यावी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने हिंगणघाट येथिल गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य व.अमोल राव तेलंग, शुभांगी ताई नगराळे ,प्रमिलाताई आडे ,शंकरराव भोकरे, सुनीताताई उमाटे, जयवंतराव कातरकर, अनिल भाऊ खंडाळकर, मंगलाताई जोगी सीमाताई टापरे,उपस्थित होते,,