नागभीड येथे 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य पत्रकार दिन साजरा

नागभीड येथे ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य पत्रकार दिन साजरा

नागभीड येथे 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य पत्रकार दिन साजरा

राजेश बारसागडे
तळोधी (बा.)अप्पर तालुका प्रतिनिधी
8830961332

तळोधी (बा.):- नागभीड येथील विश्रागृहात नागभीड तालुका पत्रकार संघ आणि तळोधी पत्रकार संघ,तळोधी (बा.)च्या सयुक्त विद्यमाने दि.६ जानेवारी 2022 रोजी मराठी वृतपत्राचे जनक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती “पत्रकार दिन” म्हणून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ट पत्रकार पंढरीनाथ बांडे होते.
सर्वप्रथम ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आणि सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या सभेचे प्रास्तविक भाषणात मनोहर मेश्राम सरांनी, दर्पणकारांच्या काळातील पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात कोणते बदल झालेले आहे.याबाबत उदाहरणासह विस्तृत मार्गदर्शन केले.आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांना अवगत असलेल्या दहा भाषांचा त्यांनी पत्रकारितेत कसा उपयोग केला.ह्याची सुद्धा सखोल माहिती दिली. त्यानंतर श्री गरफडे सर यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर तळोधी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बारसागडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार हा समाजातीलच एक घटक असून त्याच्या कडे बघण्याचा एक पारदर्शक दृष्टीकोन आहे. त्यामुळे पत्रकारांनी सुद्धा आपली प्रतिमा डागळता कामा नये. याची दक्षता घेणे गरजेचे असून कुठल्याही परिस्थितीत पत्रकारांनी एकसंघ राहिले पाहिजे.असे मार्गदर्शन केले. नागभीड पत्रकार संघाचे अध्यक्ष एडवोकेट श्याम पाथोडे यांनी पत्रकारिता करताना आपल्या हातून समाजसेवा कशी घडेल.याबद्दल विस्तृत माहिती दिली. व शेवटी अध्यक्षीय भाषणात तलोधी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष पंढरीनाथ बांडे यांनी पत्रकार हा समाजातील घटकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर वाचा फोडतो.आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत असल्याने त्यांनी प्रामाणिक राहण्याचा सल्ला भाषणातून दिला.यावेळी नागभीड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम पाथोडे,सचिव अरुण भोले,उपाध्यक्ष मनोहर मेश्राम,जेष्ट पत्रकार आर.डी.रामटेके, श्री गरफडे सर,नितीन बोदेले,भोजराज नवघडे, वनराज शामकुडे,सुरेश कोसे,संजय बागडे,तानाजी अमृतकर, यशवंत नीकुरे,रामभाऊ चौधरी,तळोधी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बारसागडे,सचिव भोजराज नवघडे, सहसचिव तुलोपचंद गेडाम,राजेंद्र शामकुळे,सुभाष गजबे, योगेश्वर शेंडे, आदींची उपस्थिती होती .संचालन यशवंत निकुरे यांनी केले. तर आभार भोजराज नवघडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here