पत्रकारांनी समाज जीवनाचा आरसा होऊन नीतिमुल्यांची पत्रकारिता कराव.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पत्रकारदिन कार्यक्रमात प्रा.डॉ.संतोष हुशे यांचे प्रतिपादन
प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
वर्धा : -आद्य पत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण पाक्षिकाच्या माध्यमातून लोकजागृती, चळवळ आणि लोककल्याणासाठी पत्रकारिता सुरू केली.दर्पण म्हणजे आरसा त्याप्रमाणे समाजजीवनाचे प्रतिबिंब म्हणून पत्रकारांनी कर्तव्याच्या बांधिलकीची पत्रकारिता स्विकारावी.असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक प्रा.डॉ.संतोष हुशे यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अकोल्यातून स्थापित अ.भा.स्तरावरील समाजाभिमुख संघटनेच्या वतीने स्व. जांभेकरांचा जन्मदिन हा दर्पण स्मृती आणि पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात ते अध्यक्षिय मनोगतातून ते बोलत होते.जेष्ठ पत्रकार प्रा.मोहन खडसे व शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य व सुप्रसिध्द कादंबरीकार श्री पुष्पराज गावंडे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी मोहन खडसे यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांनी समाजजीवनाला अनुकूल अशी अशी समाजहिताची नीतिमुल्य आणि कर्तव्यनिष्ठ पत्रकारिता करण्याचे आवाहन यावेळी केले. तर पुष्पराज गावंडे यांनी राजकारणाकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा समाजाच्या मुलभूत समस्यांना योग्य प्रकारे वाचा फोडण्याची पत्रकारांची पत्रकारिता असावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी तुकडोजी महाराज आश्रमात झालेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम राष्ट्रसंतांना पुष्पमाला अर्पण करून त्यांना व माता शारदेला वंदन करून त्यानंतर स्व.बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करण्यात आले.केंन्द्रीय पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे कार्यकारिणी पदाधिकारी सौ.जया भारती इंगोले यांनी सुत्रसंचलन केले.यावेळी उपस्थित अतिथींचे ग्रामगीता, पुष्पगुच्छ आणि संघटनेची दिनदर्शिका देऊन स्वागत करण्यात आले.जेष्ठ समाजसेविका,अनाथांची माय स्व सिंधुताई सपकाळ यांना याप्रसंगी श्रध्दांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमास केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे,कोषाध्यक्ष किशोर मानकर,विभागीय संघटक डॉ.शंकराव सांगळे,गुरूदेव सेवामंडळाचे भानुदासजी कराळे,काशिरामजी मोहिते(पंढरपूर)सुरेश पाचकवडे,जिल्हाध्यक्ष विवेक मेतकर,मोहन शेळके,सागर लोडम,अॕड.राजेश कराळे,सुरेश कुलकर्णी,नंदकिशोर चौबे,मनोज देशमुख,राहूल राऊत,मंगेश चऱ्हाटे,संदिप देशमुख,निशाली पंचगाम,किर्ती मिश्रा,दिपाली बाहेकर,दिलीप नवले,अविनाश वानखडे व ईतर पत्रकार सभासद उपस्थित होते.आभारप्रदर्शन किशोर मानकर यांनी केले.